Ganesh Chaturthi 2025 Lalbaugcha Raja Darshan esakal
Ganesh Chaturti Festival

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाताय? योग्य वेळ कोणती, दर्शन कसे घ्यावे अन् पास कुठून घ्यायचा? पाहा एका क्लिकवर

Ganesh Chaturthi 2025 Lalbaugcha Raja Darshan : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाण्याआधी संपूर्ण माहिती जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Chaturthi 2025 : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दहा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे. मुंबईतील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी महापूर उसळला आहे. नवसाला पावणारा संकट दूर करणारा म्हणून ख्याती असलेल्या लागबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर बॉलिवूड स्टारही गर्दी करतात.

केवळ मुंबईच नाही तर देशभरातील गणेश भक्तांना राजाच्या दर्शनाची आस लागलेली असते. भक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याला साकडं घालतात. पुढील वर्षी मोठ्या हौसेने नवस फेडायला येतात. यंदा तुम्हीही लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे.

लालबागच्या राजाचा इतिहास काय आहे?

लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली तीच मुळी नवसाने. सध्या अस्तित्वात असलेले मार्केट येथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरुचाळ येथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱया दर्यासारंगाच्या रुपात लालबागच्या राजाची स्थापना झाली. येथूनच `नवसाला पावणारा लालबागचा राजा' म्हणून श्री ची मूर्ती प्रसिद्ध झाली.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळील स्टेशन कोणते?

लालबागच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला मुंबईतील लालबाग परळ येथे जावे लागेल. त्यासाठी तुम्हाला कॉटन ग्रीन, चिंचपोकळी, भायखळा, लोअर परेल, ही रेल्वे स्थानके जवळ पडतील. स्टेशनवरून तुम्ही टॅक्सीने आरामात लालबागच्या राजाच्या दरबारात पोहचू शकता.

कॅब किंवा टॅक्सीने जाणार असाल तर ड्रायव्हर तुम्हाला लालबागच्या राजाच्या मंडपापर्यंत सोडू शकतो. तुम्ही स्वत: ड्रायव्हिंग करत जाणार असाल तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश नगर, डॉ. बाबा साहेब आंबेडकर रोड, लालबाग मार्केट हा पत्ता लक्षात ठेवा.

दर्शन कसे घ्यावे?

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत असतात. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आरामात आणि लगेच दर्शन होईल ही अपेक्षा करू नका. मुख्य रस्त्यापासून दर्शनरांगेतून तुम्हाला ५ ते २० तास थांबावे लागू शकते.

राजांच्या दर्शनासाठी पासेस आहेत का?

आजकाल कोणत्याही मंदिरात गेलं की पासेस देऊन पटकन दर्शन घेता येतं. पण, लालबागच्या राजासमोर सगळे सारखेच. बाप्पांच्या दर्शनासाठी कोणत्याही पासेसची सोय करण्यात आली नाही. तुम्ही केवळ रांगेतूनच दर्शन घेता येते.

बाप्पाच्या दर्शनासाठी किती रांगा आहेत.

बाप्पाच्या दर्शनासाठी दोन रांगा केलेल्या आहेत. तुम्ही राज्यातील इतर मंदिरात घेता तसेच एक मुखदर्शनाची रांग आणि दुसरी चरणस्पर्शाची म्हणजे नवसाची रांग होय. तुम्हाला मुखदर्शनाच्या रांगेतून पाच तासात दर्शन होऊ शकतं. आणि चरणस्पर्श रांगेत तुम्हाला ६ ते २० तासही लागू शकतात.

दर्शनासाठी योग्य वेळ कोणती?

तसं पाहीलं तर लालबागच्या राजाचे दर्शन २४ तास सुरू असते. त्यामुळे तिथे नेहमीच गर्दी असते. पण, तरीही तुम्हाला २० तासांऐवजी २० मिनिटात दर्शन घ्यायचे असेल तर रात्रीच्या वेळी बाप्पाच्या दरबारात जा. तसेही मुंबई शहर कधीच शांत नसते. अगदी मध्यरात्रीही तुम्हाला कॅब, टॅक्सी मिळू शकतात. तुम्ही रात्री ९ नंतर आरामात बाप्पाचे दर्शन घेऊ शकता.

राजाच्या दर्शनासाठी विकेंडला जावं का?

शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी बाप्पांचे दर्शन घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला हे दोन्ही दिवस तिथेच घालवावे लागू शकतात. त्यामुळे आठवड्यातील इतर दिवशी तुम्ही बाप्पांच्या दर्शनाचा विचार करू शकता. तसेच, मंगळवारीही येथे प्रचंड गर्दी असते. त्यामुळे तुम्ही इतर दिवशी जाऊ शकता.

दर्शनानंतर भूक लागली तर काय कराल?

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी किती वेळ लागतो याचा अंदाज नसतो. त्यामुळे तुम्ही जातानाच काहीतरी खाऊन जाऊ शकता. आणि दर्शनानंतर खाण्यासाठी म्हणाल तर तिथे जवळच लाडू सम्राट हे स्नॅक सेटर आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता.

दर्शन रांगेत आहेत सगळ्या सुविधा

बाप्पांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहता प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरवल्या आहेत. दर्शन रांगेच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर तिथे तुम्हाला टॉयलेटही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, मंडपात CCTV ही बसवण्यात आले आहेत.

खरेदीसाठी जवळपास मार्केट आहे का?

लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर जर तुम्हाला काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लालबागचे मोठे मार्केट आहे. लालबागच्या मार्केटमध्ये चिवडा गल्ली, मसालेवाली गल्ली ही फेमस मार्केट आहेत. तिथे तुम्हाला थोडीफार शॉपिंग करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Khatal Attack : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव!

Mumbai Traffic: मुंबईत धडकणार मराठा मोर्चा, आंदोलनासाठी रस्ते वाहतूक बदल, 'हे' मार्ग बंद; पाहा पर्यायी मार्ग

DMart मधून महिन्याला कसे कमवायचे लाखो रुपये? सोपी ट्रिक पाहा एका क्लिकवर..

Chakur News : चाकूरात पावसामुळे केंद्रीय विद्यालयात अडकलेले सातशे विद्यार्थी व चाळीस शिक्षक सुखरूप बाहेर

Mohan Bhagwat: ७५ वर्षांच्या निवृत्तीवर मोहन भागवत यांचं मोठं विधान; म्हणाले, मी कधीच म्हटलं नाही...

SCROLL FOR NEXT