Nicholas Stock Canon sakal
ग्लोबल

जगात लोकसंख्या वाढयला नको, आठ मुलांनंतर अभिनेत्याचे बोल

अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट निकोलस स्कॉट कॅनन यांनी नुकतीच नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट निकोलस स्कॉट कॅनन यांनी नुकतीच नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. निकोलस हा आधीच 7 मुलांचा पिता आहे आणि लवकरच त्याचे आठवे अपत्य जन्माला येणार आहे. निकोलस हा केवळ टीव्ही होस्टच नाही तर रॅपर, अभिनेता आणि कॉमेडियन देखील आहे.

41 वर्षीय निकोलस नुकताच नसबंदीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेला होता. आता लोकसंख्येत भर घालायचा नाही, असे तो म्हणाले. निकोलस पुढे म्हणाले, मी आणखी मुले जन्माला घालण्याचा विचार करत नाही. मला फक्त आता माझ्या 8 मुलांची काळजी घ्यायची आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये, निकोलसच्या ५ महिन्यांच्या मुलाचा ब्रेन कॅन्सरनी मृत्यू झाला.त्यानंतर एक महिना आधी निकोलस आणि त्याची मैत्रीण यांनी उघड केले की ते लवकरच दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहेत.

एका शोवर बोलताना निकोलस म्हणाला की मी या सर्व गोष्टींचा विचार केला नव्हता परंतु मुले ही गीफ्ट असतात. मी माझ्या आयुष्यात खूप काही केले आहे. अशा परिस्थितीत मला माझ्या मुलांकडून आनंद मिळतोय आणि जगण्याचा एक उद्देशही मिळतो.

निकोलसने सांगितले की तो आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकत नाही याचे त्याला वाईट वाटते. निकोलसने सांगितले की तो दररोज आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जातो आणि कधीकधी व्हिडिओ कॉलवर बोलतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : FASTag वार्षिक पास आता महागला! १ एप्रिलपासून अंमलबजावणी

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT