Jalgaon: Muncipal employee putting the bike parked on the road into the tractor. esakal
जळगाव

Jalgaon News : रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शाळा सुरू झाल्या असून, मुलांचे शालेय साहित्य घेण्यासाठी पालकांची दुकानावर गर्दी दिसून येत आहे. टॉवर चौकात पाल्यांसाठी शालेय साहित्य घेण्यासाठी आलेल्या पालकांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

महापालिका व शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (ता. २०) ही कारवाई केली. पार्किंगची सुविधा न करणाऱ्या व्यापारी संकुलावर मात्र महापालिकेतर्फे अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.(Action on bike parked on road jalgaon news)

महापालिकेतर्फे टॉवर चौक व इतर भागांतील रस्त्यांवर उभी असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. शहर वाहतूक पोलिस कार्यालयात दुचाकी जमा करण्यात आल्या. तब्बल सात वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिली.

दुचाकीस्वारांवर सलग कारवाई

रस्त्यावर वाहन पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता सलग कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिली. रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे रहदारीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी आल्यावरून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी आपली वाहने रस्त्यात लावू नयेत, असे अवाहनही करण्यात आले.

दुकानदारांना तंबी

विक्रेत्यांच्या दुकानासमोर दुचाकी पार्किंग होत आहे. त्यामुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक व शहर वाहतूक पोलिसांनी थेट विक्रेत्यांनाही तंबी दिली आहे. आपल्या दुकांनासमोर रस्त्यावर दुचाकी पार्किंग करण्यास बंदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे दुकानदारांनी व्यवसाय करायचा, की आता पार्किंगकडे लक्ष ठेवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकांनी वाहने लावावीत कुठे?

सध्या टॉवर चौकातील पुस्तक विक्रेते व शाळेचे ड्रेस विकणाऱ्या रेडिमेड कपड्यांच्या दुकनावरही गर्दी आहे. या ठिकाणी कुठेही पार्किंगची सुविधा नसल्यामुळे नागरिक विक्रेत्यांच्या दुकानासमोर वाहन पार्क करीत आहेत.

त्यांच्यावर वाहतूक पोलिस व महापालिका कारवाई करीत आहेत. यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी आलेल्या पालकांनी वाहने लावावीत कुठे? याची माहिती द्यावी, अशी मागणी पालकांनी केले आहे.

तळमजल्यावरील पार्किंगवर कारवाईचे काय?

नेहरू चौक ते घाणेकर चौक रस्त्यावरील व्यापारी संकुलात पार्किंग सुविधा दाखवून त्या ठिकाणी दुकाने काढली आहेत. याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाने सर्वेक्षण करून अहवालही दिला आहे. मात्र, अद्याप या संकुलांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे पार्किंग सुविधा न करणाऱ्या संकुलांवर कारवाई का नाही, याचे उत्तरही महापालिकेने देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT