Sindoor Astro Tips  esakal
लाइफस्टाइल

Astro Tips : मैत्रिणींनो, अंघोळीनंतर लगेचच करू नका हे काम, भोगावे लागतील वाईट परिणाम

Sindoor Astro Tips : विवाहीत स्त्रीयांना या गोष्टीची सवय लागलेली असते

Pooja Karande-Kadam

Sindoor Astro Tips : आपल्या समाजाने स्त्रीची काही विशेष श्रृंगार तयार केले आहेत. त्या प्रत्येक श्रृंगाराचे एक महत्त्व आहे. त्याशिवाय स्त्री अपूर्णच आहे. वयाच्या २१ व्या वर्षानंतर मुलींचा विवाह केला जातो. लग्नानंतर तिच्यात बराच बदल होतो. विवाहित महिलांसाठी सोळा शृंगार सर्वात महत्वाचे आहेत. ज्यामध्ये महिला आपल्या अंगावर विविध प्रकारचे दागिने घालतात.

सोळा शृंगारमध्ये टिकली, काजळ, मेहंदी, बांगड्या, मंगळसूत्र सिंदूरसह अनेक दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये सिंदूर किंवा टिकली यांनाही महत्त्व आहे.  धार्मिक शास्त्रानुसार सिंदूर हे स्त्रीच्या पवित्रतेचे लक्षण आहे. हिंदू धर्मात विवाहित स्त्रीला सिंदूर लावावा लागतो, याला विशेष महत्त्व आहे.

सिंदूर लावण्याची ही परंपरा हडप्पा संस्कृतीपासून चालत आल्याचे मानले जाते. त्या काळात स्त्रियांनी सिंदूर लावायला सुरुवात केली, जे विवाहित होण्याचे मुख्य चिन्ह होते. जेणेकरून इतर पुरुषांना कळेल की त्यांचा आता त्यावर अधिकार नाही.

सिंदूर लावण्यासाठी काही खास नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया सिंदूर लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

पौराणिक धार्मिक शास्त्रानुसार लग्नानंतर सिंदूर लावणे खूप शुभ असते. स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीच्या मागणीसाठी सिंदूर भरतात. सिंदूराचा रंग लाल आहे, जो माता पार्वतीची पॉझिटीव्ह एनर्जी प्रतिबिंबित करतो. सिंदूर लावल्याने अखंड सौभाग्यवती माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

तसेच सिंदूर हे देवी लक्ष्मीच्या आदराचे प्रतीक आहे. सिंदूर कोणत्याही धार्मिक विधीमध्ये वापरला जातो. हिंदू समाजात विवाहित महिलांसाठी सिंदूर लावणे हा एक महत्त्वाचा शोभा मानला जातो.

अंघोळ केल्यानंतर महिला सर्वात आधी आवरतात आणि सिंदूर लावतात

सिंदूर लावण्याचे नियम

  • शास्त्रानुसार स्त्रियांना स्नानानंतर लगेच सिंदूर लावणे वर्ज्य आहे. त्यामूळे अंघोळ झाली की आवरत असताना लगेचच सिंदूर लावू नका. त्यामुळे कुटुंबात संकटाची परिस्थिती निर्माण होते.

  • केस धुतल्यानंतर लगेच सिंदूर लावू नये, यामुळे नकारात्मकता वाढते आणि कुटुंबात वाद सुरू होतात.

  • एका स्त्रीचा सिंदूर इतर कोणत्याही स्त्रीने वापरू नये, असे करणे अशुभ आहे.

  • सिंदूर खरेदी करताना तो नेहमी पतीच्या पैशातून विकत घ्यावा.

  • काही महिला सिंदूर लावल्यानंतर ते लपवतात. पण असं करणं योग्य नाही. यामुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते.

  • आंघोळीनंतर प्रथम केस व्यवस्थित सुकवावेत आणि त्यानंतरच सिंदूर लावावा. यामुळे पतीचे आरोग्य चांगले राहते.

  • स्त्रियांचा ब्रह्मरंध्र पुरुषांपेक्षा अधिक मऊ आणि संवेदनशील असतो आणि सिंदूरमध्ये पारा धातू असतो. त्यामूळे सिंदूर लावल्याने विद्युत ऊर्जा नियंत्रित होते.

  • वैज्ञानिकदृष्ट्या डोकेदुखी, निद्रानाश आणि मेंदूशी संबंधित आजारही सिंदूर लावल्याने बरे होतात.

  • शास्त्रोक्त पद्धतीने सिंदूर लावल्याने शरीराचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो, जे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

सिंदूरची फॅशन

काही जण लग्नात भरतात तसे सिंदूर केस मधोमध केसांचा भांग पाडून संपूर्ण मांग भरतात, तर काही जण फक्त मांगाच्या पुढच्या टोकापर्यंत सिंदूर लावतात. आणि कधी कधी बाहेर जाताना किंवा चकचकीत साडीने स्त्रिया सिंदूराच्या टोकाला स्फटिकही लावतात.

सिंदूर घेऊन आता आपण स्त्रिया खूप प्रयोगशील झालो आहोत, काहीजण कपाळावर व्ही शेपमध्ये सिंदूर लावतात, हेवी मेकअप करताना, काही सिंदूर पुडीत सिंदूर भरून पुढे करतात, लॅक्मे किंवा पेन्सिलने सिंदूर आउटलाइन करण्यास प्राधान्य देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT