Long Distance Relationship esakal
लाइफस्टाइल

Long Distance Relationship: तु तिथे अन् मी इथे; Long Distance प्रेमातला गोडवा कसा वाढवावा?

काही लोकांच्या प्रेमात सात समुद्रही आडवे येतात, तरी त्यांचं नातं टिकतं

Pooja Karande-Kadam

Long Distance Relationship: आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत जे आपल्या जोडीदाराच्या फसवणुकीच्या भीतीने लाँग डिस्टन्सचे नातेसंबंध संपवतात. एकमेकांसोबत राहूनच कोणतेही नाते चांगले चालवता येते यावर त्यांचा विश्वास आहे. पण तसं नाहीय.

काही लोक त्यांच्या विचारात पूर्णपणे विरुद्ध असतात. त्यांना फक्त त्यांचा जोडीदाराचे प्रेम महत्त्वाचे असते. मग, त्यासाठी ते लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहायलाही तयार होतात. आजच्या काळात, जोडप्यांमधील लांब अंतराचे नाते खूप सामान्य झाले आहे.

पण असं दुर राहणारं प्रेम टिकवणं खूप अवघड आहे, हे नातं अनेक आव्हानांनी आणि अनेक चढ-उतारांनी भरलेलं असतं. त्यामुळेच आज अशा काही टिप्स पाहुयात. ज्यामुळे दुरच्या नात्यातील दुरावाही संपेल आणि प्रेमही वाढेल.

कदाचित यामुळेच लांब अंतराचे नाते फार काळ टिकत नाही असा लोकांचा समज आहे. साधारणपणे छोट्या-छोट्या गोष्टींमुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये दुरावा निर्माण होतो. दोन व्यक्ती एकमेकांवर खूप प्रेम करतात, पण नात्यात एकमेकांना जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा वेळ त्यांना देता येत नाही. इतकेच नाही तर या नात्यात संशयाची व्याप्ती खूप वाढते, त्यामुळे त्यांचे नाते सहजपणे तुटू शकते.

जर तुम्हीही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमचे नाते तुटण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही काही चुका करणे टाळले पाहिजे. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे नाते धोक्यात येणार नाही आणि तुमच्यात चांगली समजूतदारपणा राहील.

संशयी वृत्ती

तुमच्या जोडीदारावर शंका घेणे बंद करा. लाँग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये बहुतेक अंतर संशयामुळे वाढतात. संशय हा असा एक असाध्य रोग आहे, जो लाकडाला लागलेल्या किडेसारखा आपलं मन पोखरतो.

हेच कारण आहे की जर तुम्हाला कधी संशयासारखे काही दिसले तर लगेचच पार्टनरशी शांतपणे आणि स्पष्ट गोष्टी बोला. यामुळे तुमचे नाते वाचू शकते.

लाँग डिस्टंस नात्यात दुरावा येण्याचे चान्स जास्त असतात

असुरक्षितपणा

तुमच्या जोडीदारापासून दूर असताना असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागते.पण, तसं नसतं तुमच्या दोघांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागते. पण अशा भावना तुमच्या नात्याला कमकुवत करू शकतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून दुसऱ्याचा विचार करतोय. तर ही भीती तुमच्या मनातून काढून टाका.

असा विचार केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नेहमी उद्धटपणे वागाल, ज्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होईल.

जोडीदाराशी खोटे बोलणे टाळा

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कधी खोटं बोललात. तर हे प्रकरण उघड झाल्यावर तुमचे नाते तुटू शकते. तसेच, तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही खोटे बोललात तर तुमचे नाते पोकळ होऊ शकते.

जास्त अपेक्षा ठेवू नका

काही लोकांच्या जोडीदाराकडून मोठ्या अपेक्षा असतात, त्यांनी असे करू नये.बरेच लोक लाँग डिस्टन्स रिलेशनशिपला नकारात्मक पद्धतीने घेतात. आणि ते नेहमी त्यांच्या जोडीदाराशी काहीतरी किंवा दुसऱ्याबद्दल तक्रार करतात. इतकंच नाही तर त्यांना नेहमी अंतराची काळजी असते. कधी कधी तुमच्या दोघांचे अंतर तुमचे नाते घट्ट बनवते, त्यामुळे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपला सकारात्मक दृष्टीने घेतले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT