Mehandi Design
Mehandi Design esakal
लाइफस्टाइल

Mehandi Design : हे काय नवीन! नवरीने हातावर नाही तर चक्क ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी

सकाळ डिजिटल टीम

सध्या सगळ्याच गोष्टींचा ट्रेंड बदलत आहे. मग यात मेहंदी कशी मागे राहिल. लग्न, साखरपुडा, बारसं कोणताही सोहळा मेहंदी शिवाय पूर्ण होतच नाही. त्यामूळेच सर्वांना आवडणारी मेहंदी आर्टीफिशिअल जमान्यातही आपलं अस्तित्व टिकवून आहे.

याआधीही आपण खांदे, मान आणि कंबर इत्यादींवर दागिन्यांच्या जागी मेहंदीची काढलेली पाहिली आहे. गर्भवती स्त्रीया वाढलेल्या पोटावर मेहंदी काढतात. हे कॉमन झालं आहे. पण, आता जो ट्रेंड आपण पाहणार आहोत ते पाहुन आपण तोंडात बोटं घालणार आहात.(Mehandi Design : Trending womens fashion Blouse Mehndi Designs)

ब्रेस्ट झाकून पूर्ण ब्लाऊज मेहंदीने काढा

आता नवीन ट्रेंडनुसार नवरी लग्नात ब्लाऊजच्या जागी मेहंदी काढत आहे. ब्लाऊजचे हात, पाठीवरची डिझाईन मेहंदीनेच रंगू लागली आहे. हा ट्रेंड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.(Womens Corner)

बॅकलेस ब्लाऊजसाठी मेहंदी डिझाईन

ब्लाउजच्या मागील बाजूला मेहंदी काढली जात आहे. ब्रेस्ट सोडून बाकी ठिकाणी मेहंदीनेच ब्लाऊज काढले जात आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अगदी साध्या वाटणाऱ्या ब्लाउजवर ही हा ट्रेंड खुलून दिसत आहे. त्यामूळे यंदाच्या लग्नसराईत तूम्हीही अशी फॅशन ट्राय करायला काही हरकत नाही.

one side shoulder मेहंदी डिझाईन

जर तुम्ही बॅकलेस ब्लाउज घालणार असाल, तर तुम्ही अशी मेहंदी डिझाइन वापरून पाहू शकता. जर तुम्ही बॅकलेस ब्लाउजमध्ये नेट फॅब्रिक लावले असेल, तर तुम्ही या प्रकारची मेहंदी डिझाइन निवडू शकते.

जोडीदाराचे नाव असलेले मेहंदी ब्लाऊज डिझाईन

तूम्ही लवकरच बोहल्यावर चढणार असाल तर तूमच्या पार्टनरचे नाव हातावर काढण्याऐवजी असे पाठीवर लिहु शकता. तसंही आपल्या हातावर नवऱ्याचे नाव लिहीण्याची प्रथा आहेच आपल्याकडे. त्यामूळे हे काहीतरी हटके वेगळं करू शकता.

तुम्हाला पूर्ण पाठीवर मेहंदी काढायची असेल तर तूम्ही असे करू शकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT