Child Kidnaping esakal
महाराष्ट्र बातम्या

Child Kidnaping : मुलं पळवणाऱ्या टोळीपासून तुमच्या मुलांना जपायचंय? 'हे' वाचा

पालकांनी मुलांशी संवाद साधत काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Child Kidnapping Rumours : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह नाशिक, पुणे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये 'मुलांना पळवणारी टोळी' सक्रिय असल्याचे संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. या अफवा एका पाठोपाठ शहरांमध्ये पसरवल्या जात आहेत.

याविषयी पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या सर्व अफवा असल्याचे पोलिसांनी सांगितलेले असले तरी अशा घटना पूर्वी घडलेल्या असल्याने पालक धास्तावले आहेत. यावर पोलिसांनी या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. पण त्याबरोबरच पालकांनी मुलांशी संवाद साधत काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

याविषयी सकाळने पोलिसांशी संवाद साधला. त्यावेळी पालकांनी घ्यावयाच्या खबरदारीविषयी काही टिप्स पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही मुलं पळवणाऱ्या टोळीची धास्ती वाटत असेल आणि आपल्या मुलांना कसे जपावे हा प्रश्न पडत असेल तर या टिप्स नक्की वाचा.

या गोष्टी मुलांना समजावून सांगा

  • जसे या अफवांनी तुम्ही घाबरले आहात तसे याविषयी मुलांमध्ये भिती निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्याशी योग्य संवाद साधा.

  • मुलांना परिस्थिती समजवून सांगा. त्यांना सांगा अनोळखी व्यक्तिशी बोलू नका.

  • अनोळखी व्यक्तीने चॉकलेट, खाऊ, अगदी मोबाईल किंवा व्हीडिओ गेम असे काहीही दिले तरी कोणाकडून घेऊ नका.

  • दुसऱ्याची कोणतीही वस्तू तुमच्या हातात घेऊ नका.

  • जर कोणी तुम्हाला हात लावला किंवा धरले तर आरडा-ओरडा करा. आजूबाजूच्या लोकांना मदत मागा.

  • रस्त्याने चालताना पालकांचे हात सोडू नका. पुढे, मागे पळू नका.

पालकांनी घ्यायची काळजी

  • मुलांना परिस्थिती समजवताना त्यांच्यात भिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

  • गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेऊ नका.

  • मुलांना गर्दीत न्यावेच लागले तर त्यांचा हात सोडू नका. त्यांचा स्पर्श आपल्याला होत राहील याची काळजी घ्यावी. पदर, शर्ट, हात काहीतरी धरून ठेवायला सांगायचे.

  • सतत सतर्क रहावे

नागरिकांसाठी सुचना

  • नागरिकांनी सतत सतर्क असावे.

  • आपल्या आसपास काही गैर घडत नाही ना याकडे लक्ष असावे.

  • काही आक्षेपार्ह आढळले तर पुढाकार घेऊन अजून काही लोकांना सोबत घेऊन मुलांना प्रोटेक्ट करावे.

  • मुलाला आपल्या ताब्यात घेऊन १०० नंबरवर पोलिसांना कळवावे.

पोलिसांचे आवाहन

  • कोणतीही माहिती तुम्ही पडताळणी केल्याशिवाय पुढे फॉर्वर्ड करू नका.

  • व्हीडिओ, ऑडिओ पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका.

  • जोपर्यंत पोलीस तुम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल आणि फॉर्वर्ड गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

  • तुमच्या मोबाईलवर सोशल मीडियावर मुलांच्या अपहरणासंदर्भात काहीही आलं आणि तुम्हाला संशयास्पद वाटलं तर तातडीने तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. पोलिसांना याविषयीची सर्व माहिती द्या.

  • पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास किंवा कोणीही संशयास्पद आढळल्यास स्थानिक पोलीस किंवा १०० या क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधा. पोलीस घटनास्थळी पोहचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

Latest Marathi News Live Update : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे मुंबईत पडसाद; हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन

अमृता खानविलकरची नवी इनिंग! सुरू केला स्वतःचा बिझनेस; कसला व्यवसाय सुरू केला माहितीये?

Maharashtra Education Scam: यवतमाळमधील शिक्षक घोटाळा उघडकीस; ३९ बनावट शालार्थ आयडी; शिक्षणाधिकारी अटक!

SCROLL FOR NEXT