sane guruji
sane guruji sakal
महाराष्ट्र

शाम ते साने गुरुजी असा प्रवास जिथे घडला त्या अमळनेरची ही गोष्ट…

सकाळ डिजिटल टीम

खानदेशातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे अमळनेर. अमळनेर या शब्दाची उत्पत्ती अशी होते की मलविरहीत ग्राम म्हणजे अमळनेर. अळमनेर हे खानदेशातील एक मोठं इतिहासप्रसिद्ध शहर आहे. साने गुरुजी आणि प्रख्यात प्रताप तत्त्वज्ञान मंदिराचे संस्थापक प्रतापशेटजी आणि प्रेमजींची ही कर्मभूमी. कला, साहित्य, उद्योग, व्यापार, आयुर्वेद, कुस्ती, अध्यात्म अशा सर्वच क्षेत्रांत ख्याती पावलेली, ही भूमी.

महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात वसलेलं अमळनेर हे गाव प्राचीनकाळापासून प्रसिद्ध आहे. भिल्ल आणि गोंड राजे, पुढं यादवांची राजवट, त्यानंतर इथे फारूखी राजवट आली. इ.स. 1600 च्या सुमारास अकबराची, पुढील शतकात मराठ्यांची, त्यानंतर ब्रिटिशांची राजवट या परिसराने अनुभवली. पेशवाईच्या उत्तरार्धात मालेगावकर राजेबहाद्दूरांची अमळनेरवर सत्ता होती. शिवकाळात अमळनेरचा भुईकोट म्हणजे प्रमुख लष्करी ठाणं होतं.

इथला खंदक आणि बुरुज आज काहीसं अस्तित्व टिकवून आहेत. पुढं 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दरम्यान काही क्रांतिवीर साधू-फकिरांच्या वेशात इथल्या किल्ल्यात येऊन राहिल्याच्या नोंदी असल्याचं अभ्यासक केदार ब्रह्मे यांनी आपल्या अमळनेरवरील पुस्तकात म्हटलं आहे. बोरी नदीकाठी वसलेल्या या उद्योगभूमीमध्ये पूर्वीपासूनच लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत होती. अमळनेरची गेल्या शतकापूर्वीपासूनची ही वाटचाल खूपच रोमहर्षक आहे.

अमळनेर आणि साने गुरुजी यांचं नातं

पांडूरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी 1924 साली या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ते मराठी आणि इतिहास विषय शिकवत. शाळेच्या छात्रालयातच ते राहत होते त्यामुळे अल्पावधीतच ते विद्यार्थी प्रिय झाले. उनाड, बेशिस्त विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची त्यांची अनोखी पध्दत असे. ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिक्षा न करता ते स्वतःलाच शिक्षा करून घेत.

साने गुरुजींच्या वर्गात एक उनाड ,श्रीमंत विद्यार्थी होता. तो वर्गात सर्वांना त्रास देत असे, इतरांवर थुंकत असे. गुरुजींनी त्याला प्रेमाने नीट वागण्याविषयी अनेकदा सांगितले. तरीही तो ऐकेना. मग एके दिवशी गुरुजींनी वर्गाच्या माँनिटरला शाळेच्या कार्यालयातुन छडी आणण्यास सांगितले. हे पाहुन विद्यार्थ्यांना खूप आश्चर्य वाटलं. कारण कुणालाही शिक्षा करणं हे गुरुजींच्या स्वभावात नव्हतं. छडी आणण्यात आली.

गुरुजी आता त्या विद्यार्थ्यास बेदम मारतील म्हणून सर्व विद्यार्थी बघू लागले, तर काय आश्चर्य ! त्या विद्यार्थ्यास छडी मारण्याऐवजी गुरुजी आपल्याच हातावर सपासप छड्या मारू लागले. हे पाहून तो उनाड विद्यार्थी रडू लागला. त्याने गुरुजींचे पाय धरले, क्षमा मागितली आणि पुढे कधीच चुकीचे न वागण्याचे वचन दिले.

अमळनेर मध्येच सानेगुरुजी त्यांनी प्रौढ विद्यार्थ्यांकरीता

विद्यार्थी’ हे मासिक आणि ‘काँग्रेस’ हे साप्ताहिक गुरुजींनी इथेच सुरू केलं. याशिवाय रोज ते स्वतःच्या हस्ताक्षरांत ‘छात्रालय’ दैनिकही प्रकाशित करत असत. साने गुरुजींची बहुतांशी साहित्यसंपदा इथलीच आहे. तिथे आपण गेलो की, ‘श्याम ते साने गुरुजी’ हा पांडुरंग सदाशिव साने या गुरुजींचा जीवनप्रवास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो.

पुढे साने गुरूजीनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याच्या महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 29 एप्रिल 1930 रोजी शाळा सोडली. ते पूर्णपणे स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पुढे इंग्रजाविरुद्ध लढा करता म्हणुन 17 मे 1930 रोजी ब्रिटिशांनी साने गुरुजींना अमळनेर अटक केली. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून अमळनेरचं महत्त्व खूपच आहे. व्हिक्टोरिया नेटिव्ह जनरल लायब्ररीचं 1972 मध्ये ‘साने गुरुजी ग्रंथालय’ छात्रालयातील ज्या खोलीत गुरुजी राहत तिथे संस्थेने साने गुरुजी स्मृतीकक्ष उभारला आहे.

या कक्षात त्यांची दैनंदिनी, अन्य साहित्य, त्यांचं जीवन दर्शन घडविणारं सुंदर प्रदर्शन आहे.थोडक्यात काय तर साने गुरुजीची स्मृती कायमस्वरूपी जतन करून ठेवली आहे.

‘पुरुषोत्तमयोग, भगवद्‌गीतेची गुरुकिल्ली’ या ग्रंथांचे लेखक असलेल्या प्रतापशेठ यांचं उद्योग, शिक्षण, तत्त्वज्ञान, साहित्य, सामाजिक क्षेत्रांतील योगदान हे अभूतपूर्वच आहे. रविकिरण मंडळाचे संस्थापक कवी माधव ज्युलियन हेही काहीकाळ अमळनेरला होते. ‘संगमोत्सुक डोह’ ही त्यांची गाजलेली कविता त्यांना अमळनेरच्या रेल्वे पुलाजवळ नदीला मिळणाऱ्या एका ओढ्याच्या काठावर सुचली, अशी नोंद आहे.

1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.

पुढे 11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले.

"बलसागर भारत होवो…विश्वात शोभूनी राहो

राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो…!

या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी भारतीय लोकांच्या मनावर अधिक प्रभाव पडला. हे कविता लोक गाऊ लागले.अस म्हणतात की त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या लिहलेल्या काही काव्यपंक्ती जप्त देखील केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT