कोरोनानंतर या वर्षी राज्यातील परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचे बोलले जात आहे. कोरोनामुळे अनेक महिने राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. परंतु आता राज्यातील कोरोना निर्बंध हटवल्याने येणाऱ्या परीक्षा ऑफलाईनच होणार, (Offline Exams) अशी दाट शक्यता आहे. यामुळे आगामी उन्हाळी परीक्षेला धरुन राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे आपली व्यथा मांडली आहे. राज्य सरकारने उन्हाळी परीक्षांचा निर्णय सर्व विद्यापीठांवर सोपविल्याने विद्यापीठे मनमानी कारभार करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी या पत्राद्वारे केली आहे. (Maharashtra Students Welfare Association wrote a letter to CM Uddhav thackeray regarding the issues and solutions for the summer semester exam. )
विद्यार्थ्यांनी पत्रात लिहिले, "विद्यार्थ्यांना उन्हाळी परिक्षेचा अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवला जात असून, अशी ऑफलाइन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार, अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात आहे. विद्यार्थ्यांच्या मते,ऑफलाइन परीक्षांचा अभ्यास करत असताना असाइनमेंट, मिनी-प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल आणि इतर 2 महिन्यांत पूर्ण करणे कठीण जाणार. शिवाय, अभ्यासासाठी इतका कमी वेळ असतानाही अभ्यासक्रमात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. सोबतच अनेक वसतिगृहे अजूनही बंद आहेत. या सर्व अडचणींना सामोरे जाताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे."
राज्य सरकारच्या उत्तराची वाट पाहू अन्यथा आम्ही घटनात्मक आंदोलन करू, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र विद्यार्थी कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव एडके यांनी यावर
वैभव एडके म्हणाले, ‘आम्हाला विद्यार्थ्यांकडून हजारो प्रश्ने येत आहेत. ते अत्यंत त्यांच्या भविष्यातील करिअरबद्दल चिंतित आहेत. प्रत्येकजण ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल बोलत असतात, परंतु अपूर्ण अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबद्दल कोणीही बोलत नाही. सर्व विद्यापीठांमध्ये परीक्षा एकसमान पद्धतीने घेतल्या पाहिजेत. आम्ही राज्य सरकारच्या उत्तराची वाट पाहतोय."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.