Corbevax vaccine सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

लस घ्यायला मुलेच नाहीत! राज्यातील कॉर्बेव्हॅक्स लसीचे अनेक डोस वाया

गेल्या दोन आठवड्यात राज्यात ९.५ लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले

सकाळ डिजिटल टीम

भारताचे औषध महानियंत्रक (( Drugs Controller General of India) यांच्या तज्ज्ञ समितीने बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी काही अटींसह कोर्बेव्हॅक्स ( Corbevax ) लसच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली असून १२ ते १५ या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र यात आता कॉर्बेव्हॅक्स लसी घेण्यासाठी पुरेसे मुले समोर येत नसल्याने महाराष्ट्रात अनेक डोस वाया जात असल्याची बाब समोर आली आहे.

लसीकरणासाठी १२-१४ वयोगटातील मुले समोर येत नसल्याने, कॉर्बेव्हॅक्स लसीच्या डोसच्या अपव्ययाचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. ही बाब राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीत दिसून आली. (the amount of wastage of corbevax vaccine doses is higher in Maharashtra)

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, लसीकरणात हळूहळू वाढ झाल्याने लसींचा अपव्यय कमी होईल.साधारणत: २० मुलांना लस देण्यासाठी कॉर्बेव्हॅक्सची 10 मिलीलीटरची कुपी (मात्रा) वापरली जाते आणि ही कुपी उघडली की चार तासांत ती वापरावी लागते. परंतु १२-१४ वयोगटातील मुलांचा या लसीकरणाकडे कल कमी असल्याने लसीकरण केंद्रांना पूर्ण कुपी वापरण्यासाठी पुरेशी मुले मिळत नाहीत. यामुळे डोस वाया जात आहे.

महाराष्ट्रातील विशेषत: नंदुरबार, परभणी आणि धुळे या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कॉर्बेव्हॅक्स लसीचे अनेक डोस वाया जात असल्याचे समोर आले.

कोर्बेवॅक्स लसीबद्दल अनेकांमध्ये संकोचाची भावना आहे कारण ही एक नवीन लस आहे. त्यामुळे या लसीला योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पहिल्या आठवड्याच्या तुलनेत आता थोडा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

१६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले. गेल्या दोन आठवड्यात राज्यात ९.५ लाख बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे तर राज्यात या वयोगटातील सुमारे ४० लाख मुले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT