Gangs Of Wasseypur Actor Zeishan Quadri booked for cheating fir registered Google
मनोरंजन

'गॅंग्ज ऑफ वासेपुर'च्या अभिनेत्या विरोधात FIR, आरोपांची यादी एकदा वाचाच...

'गॅंग्ज ऑफ वासेपूर' मधील भूमिकेमुळे जीशान कादरीला ओळख मिळाली होती. त्यानं अनेक बॉलीवूड सिनेमे,वेब सिरीज,टी.व्ही शो साठी काम केलं आहे.

प्रणाली मोरे

Crime Case: 'गॅंग्ज ऑफ वासेपूरचा' अभिनेता आणि लेखक जीशान कादरी(Zeishan Quadri) सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. जीशान कादरीच्या विरोधात मुंबईत मालाड येथील पोलिस स्टेशनमध्ये सेक्शन ४२०-४०६ अंतर्गत चोरीचा आणि फसवणूक केल्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चला,जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण?(Gangs Of Wasseypur Actor Zeishan Quadri booked for cheating fir registered)

जीशान कादरीवर सिनेनिर्मात्या आणि फायनान्सर शालिनी चौधरी यांनी फसवणूकीचा आरोप केला आहे. जीशानवर आरोप लावला गेला आहे की त्यानं शालिनी चौधरींना तब्बल २६ लाख रुपयांचा गंडा लावला आहे. जीशानवर शालिनी चौधरींनी कार चोरल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे.

शालिनी चौधरी म्हणाल्या आहेत-''मी माझ्या दोन्ही मुलांसोबत मालाडला राहते. माझी स्वतःची Shalini Choudhary Films नावाची कंपनी आहे. २०१७ साली जीशान कादरीला मी भेटले होते. त्याला सोनी एंटरटेन्मेंटवरील शो 'क्राइम पेट्रोल'साठी आर्थिक सहाय्य हवं होतं. त्याची एक कंपनी Friday to Friday मध्ये त्याची पत्नी म्हणून स्वतःची ओळख करून देणारी मैत्रिण प्रियंका बस्सी देखील पार्टनर होती. आम्ही क्राइम पेट्रोल शो साठी एकत्र काम केलं आणि त्याच्या कंपनीच्या 'हलाल' सिनेमाशी देखील मी जोडले गेले होते. त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास होता''.

शालिनी चौधरी पुढे म्हणाल्या की,''जीशान कादरी आणि त्याची पत्नी प्रियंका यांनी सोनी टीव्ही वर येणाऱ्या एका कॉमेडी शोचं पार्टनर बनण्यासाठी आपल्याला गळ घातली होती. जीशानने त्यावेळी शालिनीला म्हटलं होतं की,शो साठी काम करण्यासाठी त्याच्याकडे कार नाही. तो चांगल्या कारच्या शोधात आहे. यानंतर जीशान आणि त्याच्या पत्नीनं शालिनी यांचा विश्वास संपादन करून त्यांची Audi-A-6 कार मिळवली,ज्याचा नंबर MH14 FM 3212 असा आहे. पण काही कालावधीनंतर जीशानने शालिनी कार परत मागण्यासाठी फोन करायच्या तेव्हा त्यांचे कॉल घेणं बंद केलं''.

आता जीशान कादरीवर हा काही पहिला आरोप नाही. २०२० साली मुंबईतील अंबोली पोलिस स्टेशनात जीशानच्या विरोधात सेक्शन ४२० अंतर्गत फसवणूकीचा आरोप दाखल केला गेला होता. कादरीवर सिनेनिर्माता-फायनान्सर जतीन सेठीनं १.५ करोड रुपयाचा फसवणूकीचा आरोप लावला होता.

जीशान कादरीनं अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गॅंग्ज ऑफ वासेपूर' सिनेमात काम केलं आहे. या सिनेमात जीशानने 'डेफिनिट' ची व्यक्तिरेखा साकारली होती. जीशानला बॉलीवूडमध्ये याच सिनेमामुळे ओळख मिळाली. जीशानने हंसल मेहता यांच्या 'छलांग' सिनेमातही काम केलं आहे. जीशानने 'रिवॉल्वर रानी','होटल मिलन' सारख्या सिनेमातही काम केलं आहे. जीशान वेब सिरीज 'बिच्छू का खेल' मध्ये एका पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेतही दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT