malaika arora and arjun kapoor  google
मनोरंजन

अपघातानंतर मलायकाने प्रियकरासोबत घरामध्ये..

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा हीच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर आता तिची प्रकृती स्थिर असून मलायकाने आपला प्रियकर अर्जुन कपूर सोबत मुंबईच्या घरामध्ये पाऊल ठेवले आहे.

नीलेश अडसूळ

bollywood news : बॉलीवूड मध्ये कायमच चर्चेत असलेले आणि आपले आयुष्य निर्भीडपणे जगासमोर ठेवणारे मलायका अरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. ते कधी एकत्र येतात, कुठे जातात अशा सर्व घडामोडी बारकाईने टिपल्या जातात. किंबहुना त्याबाबत ते दोघेही समाजमाध्यमांवर माहिती देत असतात. परंतु दोन दिवसांपूर्वी एक छोटा अपघात मलायका अरोरो हिच्या गाडीला झाला. त्यामध्ये तिला किरकोळ दुखापत झाल्यानंतर या प्रसंगाने ती आणि अर्जुन कपूर अधिकच जवळ आले आहेत.

मलायका अरोरा हिच्या गाडीला शनिवारी अपघात झाला, या अपघातात ती किरकोळ जखमी झाली परंतु प्रसंगावधान दाखवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच ती बरी असल्याची वार्ता तिची बहीण अमृता अरोराने माध्यमांना दिली. सध्या मलायका घरी परतली असून तिला रुग्णालयात आणण्यासाठी तिचा प्रियकर अर्जुन कपूर गेला होता , अशी माहिती मिळाली आहे.

रविवारी तिला घरी आणण्यात आले. सोशल मीडियावर छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही बाब समोर आली. या व्हिडिओत मलायकाला तिच्या घरी सोडून प्रियकर अभिनेता अर्जुन कपूर स्वतःच्या घराकडे रावना होताना दिसला आहे.

मलायकाला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर तीअर्जुन कपूरसोबत घरी परतली. तीच्या प्रकृतीतही बराच सुधार आहे.अशी खात्रीशीर माहिती माध्यमांनी दिली आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा देखील विचारपूस करण्यासाठी मलायकाच्या निवासस्थानी गेली होती. तिच्यासोबत तिचा पती शकील लडकही होता.

मलायका पुण्याहून मुंबईला परतत असताना २ एप्रिल रोजी पनवेल नजीकच्या फूड-मॉलजवळ सायंकाळी ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. एक बस आणि दोन कार यांची टक्कर झाली आणि त्यातील एक मलयकाच्या गाडीला धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT