photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

अमिबासारखा वाढला आकार; पण कुणाचा ते वाचा 

अनिल जमधडे

औरंगाबाद : पैठण रस्त्यावरील कांचनवाडीचा महापालिकेत समावेश झालेला आहे; मात्र या गावांना शहराचे स्वरूप काही आले नाही. अनेक अपार्टमेंटच्या कॉलन्या तयार झाल्या, सोयीसुविधांपासून कोसोदूरच राहिल्या आहेत. 

नवीन वसाहती वाढल्या 

कांचनवाडी-नक्षत्रवाडी ही शहरालगतची गावे आहेत. अगदी जवळजवळ असलेला हा भाग महापालिकेत समावेश झाल्यानंतर आमूलाग्र बदलेल असा येथील नागरिकांचा समज भाबडा ठरला. शहरालगतचा परिसर असल्याने अमिबासारख्या आकारहीन वसाहतींनी पाय पसरले आहेत. 

मनपाचे दुर्लक्षच 

कांचनवाडी या भागात व्हिजन सिटी, हिंदुस्थान आवास, नक्षत्र पार्क, अक्षय लाभ सोसायटी, नाथपुरम, सारा हर्मोनी यासह अनेक वसाहती उभ्या राहिल्या. फ्लॅट संस्कृतीचा सध्या बोलबाला सुरू झालेला आहे. एकापेक्षा एक सरस फ्लॅटच्या वसाहती या भागात उभ्या राहत आहेत. हा परिसर वाढत असला तरीही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सोयीसुविधांपासून मात्र कोसोदूर आहे. ड्रेनेजलाइन नाहीत, ज्या भागात आहे त्या भागातील ड्रेनेज लाइन जुनाट झाल्या आहेत. 

सोयीसुविधांचा अभाव 

कांचनवाडीमध्ये उघड्या नाल्यांची समस्या आहे. काही प्रमाणात रस्त्यांचे कामे झाली आहेत. मात्र, नवीन वसाहतींकडे जाणाऱ्या भागांना रस्त्यांचा पत्ताच नाही. वेड्या बाभळी, झाडाझुडपांच्या रस्त्यांमधून फुफाट्यातून वाट काढत अपार्टमेंटपर्यंत पोचण्याची कसरत येथील नागरिकांची पाठ सोडत नाही. पैठण रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने नवीन फ्लॅट संस्कृतीने चांगलेच बाळसे धरले आहे. 

धोकादायक वाहतूक 

महामार्गावरून घरापर्यंत येताना अवजड, धोकादायक वाहतुकीचा धोका टांगत्या तलवारीसारखा कायम आहे. वारंवार होणाऱ्या अपघातात आपला नंबर केव्हा लागेल याचा नेम नाही, अशी नागरिकांची भीती बोलण्यातून जाणवते. नाल्या उघड्या आहेत. पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसते. पथदिवे पुरेसे नसल्याने अंधाराचे साम्राज्य कायमच आहे. 

पाण्याची टाकी नुसतीच उभी 

हिंदुस्थान आवास नावाची जुनी वसाहत आहे. या वसाहतीत विकसकाने पाण्याची टाकी तयार करून दिलेली आहे. मात्र, टाकी तयार झाल्यापासून एकही दिवस टाकीत पाणी पडलेले नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाची ही पाण्याची टाकी केवळ शोपीस म्हणून दिमाखात उभी आहे. पाण्याच्या टाकीकडे पाहूनच तहान भागवावी लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. महापालिकेचे पाणी या भागात येतच नाही. पाणी नसल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी दररोज पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी दरमहा सातशे ते हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. वापरण्यासाठी नागरिकांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. 

काय आहे समस्या? 

0 नवीन वसाहतींना रस्ते नाहीत 
0 ड्रेनेजलाईनचा पत्ताच नाही 
0 नळ योजना नाही 
0 पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते 
0 महामार्गावर कायम अपघाताची शक्‍यता 
0 पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य 

काय म्हणतात नागरिक... 

पिण्यासाठी पाणी नाही 
अंबादास राणे : महापालिकेने आजपर्यंत या भागात पाणी दिलेले नाही. पाणी नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तातडीने नवीन पाइपलाइन करून पाणी दिले पाहिजे. 

पाण्याची टाकी शोपीस 

विष्णू चावरे : हिंदुस्थान आवासची पाण्याची टाकी म्हणजे केवळ शोपीस आहे. टाकी झाल्यापासून त्यात पाणी आलेच नाही. नागरिकांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. 

पथदिवे नाहीत 

पुंडलिक पाटील : पथदिवे नसल्याने संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने, महापालिकेने रस्त्यावर दिवे बसविले पाहिजेत. 

पाण्याची सोय करावी 

एस. बी. कोडते : महापालिकेची नळयोजना नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत अहे. पाण्यासाठी बोअरशिवाय पर्याय नाही. नळयोजना करण्याची गरज आहे. 

मूलभूत सोयी नाहीत 

बाबासाहेब मगरे : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा भाग महापालिकेत असूनही उपयोग झालेला नाही. महापालिकेने केवळ मूलभूत सोयीसुविधा तरी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. 

पाण्यासाठी जारचा वापर 

भगवान ठोकळ : पिण्याच्या पाण्याची सर्वांत गंभीर समस्या आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा जार विकत घ्यावा लागत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. 

परिसराला बकाल स्वरूप 

जगन्नाथ कुकडे : कांचनवाडी-नक्षत्रवाडी हा भाग वाढत असला तरीही सोयीसुविधा नसल्याने संपूर्ण परिसराला बकाल स्वरूप आलेले आहे. खेड्यापेक्षाही वाईट अवस्था झाली आहे. 

ड्रेनेजलाईन नाही 

रामकिशन वाव्हळ : महापालिका लक्ष देत नाही, त्यामुळे अद्यापपर्यंत ड्रेनेजलाईन झालेली नाही. ड्रेनेजलाईन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्‍न कायम आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT