Aurangabad News 
मराठवाडा

दुचाकीवर धम्मचक्र लावले म्हणून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दुचाकीवर धम्मचक्र असल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करुन, पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात दहा ते बारा आरोपींपैकी पोलिसांनी एकाला शनिवारी (ता.21) दुपारी अटक केली. दिपक सुभाष केतकर (21, रा. रेलगाव ता. फुलंब्री) असे त्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात विनोद उत्तम कसारे (25, रा. रेलगाव, ता. फुलंब्री) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, 30 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी कसारे याच्या गावातील संतोष उर्फ समधान सुधाकर जाधव, आकाश भालेराव हे दोघे दुचाकीवर किनगाव येथे गेले होते. संतोषने कसारेला फोन करुन दुचाकीवर धम्मचक्र बघुन दहा ते बारा जण आम्हाला मारहाण करीत असुन, दुचाकीचीदेखील तोडफोड केल्याचे सांगितले. त्यानुसार कसारे हा पोलिस पाटील सतीष ठेंगे याला भेटला व त्याला घडलेली घटना सांगितली. त्यावर सतीष ठेंगे याने कसारेला जातीवाचक शिवीगाळ केली. कसारे जखमी संतोष व अकाशला घेवुन पोलिस ठाण्याकडे निघाला असता वारेगाव किनगाव फाट्यावर सतीष ठेंगे याने गाडीवर दगडफेक करुन शिवीगाळ केली.

1 सप्टेबररोजी तक्रारदार विनोद हा त्याचा मोठा भाऊ सचिन कसारे, संतोष व आकाश असे चौघे तक्रार देण्यासाठी औरंगाबादेतील पोलिस आयुक्त कार्यालयाकडे जात असतांना, किनगाव येथील राहुल गाडेकर व अमोल चव्हाण यांनी फोन करुन चौघांना एका हॉटेलवर बोलाविले. तेथे दिपक केतकर, कृष्णा काळे यांनी गाडी अडवून धमक्‍या दिल्या. प्रकरणात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला सोमवारपर्यंत (ता.23) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. पाटंगणकर यांनी दिले. सुनावणीदरम्यान सहाय्यक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident : लोक खरेदी करत होते, तेवढ्यात बस आली अन्...; भांडूप बस अपघाताचा CCTV VIDEO समोर

Nagpur : फडणवीसांच्या विश्वासू कार्यकर्त्याला भाजपनं नाकारलं तिकिट, नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा

BEST Bus: मुंबईकरांसाठी धावणार अतिरिक्‍त बेस्‍ट बस, नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशासनाचा निर्णय; कसे असेल नियोजन?

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

समृद्धी महामार्गावर ट्रक अपघातात वाचले, रस्त्यावर थांबले असताना रुग्णवाहिकेनं उडवलं; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT