Latur News 
मराठवाडा

मला खून करायचा नव्हता, पण...

सुशांत सांगवे

लातूर : लातुरात उपचारासाठी आलेल्या भारत सुधीर महाजन (वय २५) यांच्या खुनाचा तपास दोन महिन्यांपासून सुरू होता. अखेर पोलिस आरोपीपर्यंत पोचले. त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, ‘‘मला खून करायचा नव्हता. रोख रक्कम आणि सोने घेऊन पळून जायचे होते. पण महाजन यांनी प्रतिकार करायला सुरवात केली. तेव्हा यांच्यासोबत झटापट झाली आणि त्यातूनच खून झाला.’’ त्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले.

महाजन हे मुळचे मुरूडचे. ते २३ सप्टेबर रोजी लातूरमध्ये उपचारासाठी आले. त्यानंतर ते सायंकाळी बसस्थानकात गेले. तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे त्यांच्याशी कुटूंबियांचा संपर्कच तुटला. कुटूंबियांनी शोधाशोध करून दोन दिवसांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर २७ सप्टेबर रोजी गोरक्षण जवळील मोकळ्या जागेत कुजलेल्या स्थितीत अनोळखी प्रेत पोलिसांना आढळून आले. महाजन यांच्या कुटूंबियांनी तक्रारीत केलेले वर्णन आणि प्रेताचे वर्णन काही प्रमाणात एकसारखे दिसू लागले. त्यामुळे पोलिसांनी महाजन यांच्या कुटूंबियांना बोलावून घेतले. त्यांना कुजलेले प्रेत दाखवले. त्यावेळी पायातील बुटावर महाजन कुटूंबियांनी भारत महाजन यांना ओळखले. त्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला.

तपास सुरू असताना हा खून उदगीरमधील जावेद या व्यक्तीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे ते तातडीने उदगीरला रवाना झाले. जावेद महेबूब शेख (वय २५, रा. बिदर गेट, उदगीर) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या खूनाची विचारपूस करताना ‘तुम्ही जो विचार करत आहात, तसे काहीही नाही’, असे जावेदने पोलिसांना सांगितले. हे वाक्य ऐकल्यानंतर पोलिसांनी आणखी कसून चौकशी केली तेव्हा जावेदने या खूनाची कबुली दिली.

खून करायचा नव्हता पण झटापटीत झाला, असे सांगून त्याने इतर दोन आरोपींच्या मदतीने हे कृत्य केल्याचेही सांगितले. त्याच्याकडील महाजन यांची आंगठी पोलिसांनी जप्त केली. हैदराबाद येथे पथक रवाना करून जावेद कुरेशी (वय २७) या त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे महाजन यांचा मोबाईल आणि त्यांचे आधार कार्ड पोलिसांनी आढळून आले. जावेद कुरेशी हा मुळचा इंदोरचा असून तो हैदराबाद येथे बिगारी काम करतो. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नानासाहेब लाकाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक एस. डी. पवार, पोलिस उपनिरिक्षक किरण पठारे, वहिद शेख, भीमराव बेल्लाळे, तुकाराम माने, गोविंद चामे, अभिमन्यू सोनटक्के, दत्तात्रेय शिंदे, धैर्यशिल मुळे, मंगेश कोंडरे, रमेश कांबळे, चिंतामणी पाचपुते, राम सावंत या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT