Osmanabad News 
मराठवाडा

मराठवाड्याचे भूमिपुत्र 'उचल्या'कारांचा संमेलनाला विसर

उत्कर्षा पाटील

संत गोरोबा काका साहित्य नगरी (उस्मानाबाद) - मराठवाड्याचे भूमिपुत्र 'उचल्या'कार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचा साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विसर पडला. गायकवाड यांनी शोषित, वंचितांच्या वेदना ज्यांनी आपल्या साहित्यातून मांडून त्यांचे वास्तव जगासमोर आणले. लक्ष्मण गायकवाड यांच्या जन्मगावी म्हणजेच उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रणही देण्यात आले नाही अशी, खंत गायकवाड यांनी व्यक्ती केली.

मराठवाड्याच्या मातीला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देणारे भूमिपुत्र म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड ओळख आहे. लक्ष्मण गायकवाड यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील धनेगाव हे आहे. जिल्हा विभाजनानंतर त्यांचे गाव लातूर जिल्ह्यात गेले असले तरी त्यांची मूळ ओळख ही उस्मानाबाद जिल्ह्याची असल्याचे त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबीत होते. त्यांच्याच मूळ जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे. परंतु, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळासोबत स्थानिक नियोजन समितीचेही गायकवाड यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यांना साहित्य संमेलनाचे साधे  निमंत्रणही देण्यात आहे नाही.

गायकवाड यांच्या 'उचल्या' या आत्मकथेने मराठी साहित्य विश्वामध्ये एक नवीन वादळ निर्माण केले होते. आज भारतातील अठरा भाषांमध्ये त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. राज्यातील शोषित वंचित आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा वेदना त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडल्या आहेत. त्यांची आत्तापर्यंत 13 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

इतकेच नव्हे तर कर्नाटक पंजाब या राज्यातील विद्यापीठांमध्ये त्यांची पुस्तके अभ्यासक्रमासाठी असून तब्बल सातहून अधिक पुस्तके ही हिंदी भाषेमध्ये प्रचंड गाजलेली आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र आणि जन्मगावही मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याने त्यांना या साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रण मिळाले नसल्याने त्यांनी याबाबत खंत व्यक्त केली.
 


ज्या जिल्ह्यात माझा जन्म झाला त्या जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असताना मला साधे निमंत्रण येऊ नये, ही माझ्यासाठी खूप वेदनादायी बाब आहे 
- लक्ष्मण गायकवाड
 

संबंधित बातम्या -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT