आता जिमपण आॅनलाईन करायची का? मालकांना पडला प्रश्न 
मुंबई

आता जिमपण आॅनलाईन करायची का? मालकांना पडला प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मार्चमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊननंतर अनेक बिझनेसचे कुलुप ऊघडण्यास सुरुवात झाली, पण जिम कधी सुरु होणार याची प्रतिक्षा संपण्यास तयार नाही. त्यामुळे काही जिम चालकांनी आपला बिझनेस बंद केला तर काहींनी ऑनलाईनचा पर्याय पसंत केला आहे. मुंबईतील काही जिम इन्स्ट्रक्टरनी ऑनलाईन मार्गदर्शन केले आहे, पण जिमच्या अनेक संचालकांसमोर गंभीर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरात मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे जागेचे भाडे जास्त आहे तसेच जिम इन्स्ट्रक्टरचे मानधनही असते. या परिस्थितीत टिकाव धरणे अवघड झाले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठीच साह्य करणाऱ्या जिमना बंदी आहे, अशी खंत व्यक्त होत आहे. 

लब्धप्रतिष्ठित सोसायटी परिसरात असलेल्या ठिकाणी जिम सुरु करण्यासाठी दोन ते तीन कोटींची गुंतवणूक जागेत करावी लागते. त्याशिवाय साहित्य खरेदी, अनुभवी ट्रेनर आणि अन्य कर्मचाऱ्यांचाखर्च असतो. जिम, फिटनेस सेंटर, तरण तलाव 13 मार्चपासून बंद आहेत. केवळ एका दिवसाची नोटीस देऊन हा निर्णय झाला. त्यामुळे अनेकांना मेंबरशिपही घेता आली नाही. जवळपास तीन महिन्यांपासून उत्पन्न नसल्यामुळे अनेक छोट्या जिम तसेच फिटनेस सेंटर बंद झाली आहेत. त्यांनी आपल्याकडील साहित्यही विकले आहे.

एका सर्वेक्षणानुसार भारतात जिम, फिटनेस सेंटर, योगा स्टुडिओ तसेच फिटनेस साहित्यांची विक्री करणारी केंद्र ही एकंदरीत पन्नास लाख लोकांना रोजगार देतात. अन्य एका सर्वेक्षणानुसार मुंबई आणि दिल्लीतील 55 टक्के जिम तसेच फिटनेस ट्रेनर प्रमुखांनी आपला बिझनेस बंद करण्याचे ठरवले आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास काही आठवड्यात 80 टक्के जिम आणि फिटनेस ट्रेनर बंद होतील अशी भिती व्यक्त होत आहे. 

मुंबई तसेच परिसरातील अनेक जिम आणि फिटनेस सेंटर ही लघु उद्योग म्हणून नोंदणी झालेली आहेत. त्यांनाही लघु उद्योगांना असलेल्या योजनेतून साह्य देण्याची मागणी झाली आहे. मुंबईतील काही बड्या फिटनेस जीमनी ऑनलाईन ट्रेनिंग सुरु केले आहे. त्यांनी आपल्या नियमित ग्राहकांना व्हिडिओ लिंक पाठवण्यास सुरुवात केली आहे. अनुभवी ट्रेनरना यास पसंती मिळत आहे, पण नवोदित ट्रेनरचा प्रश्न कायम आहे. ऑनलाईनलाही जास्त पसंती मिळत नाही, याकडे लक्ष वेधले जात आहे. 

आता सर्वांनीच आशा सोडलेली नाही. काही जिम तसेच फिटनेस ट्रेनरनी आपल्या क्लाएंटचे मत जाणून घेतले आहे. त्यातील बहुसंख्यांनी जिम सुरु झाल्यावर एका महिन्यात येण्याची तयारी दाखवली आहे. मात्र त्यापूर्वी आपले जिम पुरेसे सुरक्षित असेल ना याची खातरजमा करणार असल्याचे सांगितले.
जिम तसेच फिटनेस ट्रेनरनी त्यासाठी काही उपाय अमलात आणण्याचेही ठरवले आहे. अर्थात तपमान बघणे, मास्क, ग्लोव्हज्् बंधनकारक करतानाच आरोग्य सेतू अॅपचीही सक्ती करण्याचा विचार मांडला आहे. त्याचबरोबर एकावेळी किती जणांना प्रवेश द्यावा याबाबतही विचार सुरु केला आहे. त्याचबरोबर सुरुवातीस जिममधील कालावधी कमी करण्याबरोबरच शॉवर घेण्यास प्रतिबंध करतानाच प्रत्येकाने स्वतंत्र जिम शूज आणण्याची सूचना करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT