dahi handi 
मुंबई

Corona Effect : यंदा दहीहंडी उत्सव होणार?, गोविंदा पथकांसह आयोजकांसमोरही गहन प्रश्न

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आणखी पुढील काही महिने कोरोनाच्या सावटातच काढावे लागणार, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये होणाऱ्या दहीहंडी उत्सवात लोणी लुटायला मिळेल का? असा सवाल गोविंदा पथकांना पडला आहे. या उत्सवात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करणार, हा मोठा प्रश्न पथकांसोर आहे. तसेच, राज्य सरकारच्या निर्णयाकडेही मंडळ, गोविंदा पथकांचे लक्ष आहे. त्यामुळे सध्या गोविंदा पथक आणि दहिहंडी समन्वय समिती वेट अॅण्ड वॉच भूमिकेमध्ये आहे. 

मुंबई दहीहंडी उत्सवाचे वेगळे वलय आहे. परंतु गेले तीन वर्ष या उत्सवामध्ये अनेक विघ्न आली. मंडळांना सलग तीन वर्षे न्यायालयाची पायरी चढावी लागली; तरीही दिलेल्या आदेशाप्रमाणे गोविंदांनी उत्साहात उत्सव साजरा केला; मात्र यंदाचे कोरोना संकट हे अधिक आव्हानात्मक आहे. त्यामध्ये शारिरिक अंतर राखायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. दहीहंडी फोडताना थराथर रचले जातात. एका संघात किमान 100 आणि जास्तीत जास्त 300 ते 350 गोविंदांचा समावेश असतो. नेहमी दहीहंडी उत्सवासाठी मे अखेरपासून मोठ्या पथकांचा सराव सुरू होतो; मात्र यंदा सोशल डिस्टन्सिंगमुळे सरावाला अजून सुरूवात झाली नाही. परिस्थिती पाहता पुढे सराव कसा करायचा, हाही प्रश्न गोविंदा पथकांसमोर आहे. 

दहीहंडी उत्सवाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे गोविंदा पथकांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली. तसेच आयोजकांचाही खर्च वाढला. उत्सवावासाठी स्पॉट विमा, गोविंदाचा विमा असणे आवश्यक आहे. तसेच गोविंदाच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी सेफ्टी उपकरण देणे बंधनकारक आहे. या नियमांमुळे अनेक आयोजकांनी माघार घेतली. त्यामुळे बक्षीस रक्कम कमी झाली; मात्र स्पर्धा कायम राहिली. मागील वर्षापासून आर्थिक मंदीमुळे कॉर्पोरेट कंपन्यांनीही हात आखडता घेतला. टीशर्ट, वाहतूक खर्च भागवणे यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. आता तर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे या वर्षी उत्सवासाठी आवश्यक रसद मिळण्याची शक्यता कमी आहे. गोविंदाना प्रायोजक भेटणेही कठीण होणार आहे. बहुतांशी आयोजक आणि प्रायोजक हे तेथील स्थानिक नेते असतात. परंतु कोरोनामुळे सर्वच नेते या लढ्यात आपआपल्या परिने मदत करत आहे. या परिस्थितीत नेते मंडळी उत्सवासाठी कितपत पुढाकार घेतील याबद्दल शंका आहे. 

लवकरच बैठक
दहिहंडी समन्वय समितीने दहीहंडी उत्सवाबाबत अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. समिती सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. जून महिन्यात या सर्व परिस्थितीचा विचार करुन दहिहंडी उत्सवाबाबत पथकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे समितीकडून सांगण्यात आले.

उत्सव साजरा करण्यावर ठाम
गेल्या आठवड्यापासून ठाणे, मुंबईच्या गोविंदा पथकांची ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा सुरू आहे. गोविंदा पथक उत्सव करण्यावर ठाम आहे. त्याचे स्वरुप कसे असेल याबाबत अजून चित्र स्पष्ट होत नाही. त्यावरच विचार सुरू आहे. काही आयोजक उत्सव साजरा करायला तयार आहेत. परंतु राज्य सरकार उत्सवाबाबत काय भूमिका घेते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत. दहीहंडी उत्सवात शारिरिक अंतर ठेवणे मोठे आव्हान आहे. त्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती यंग उमरखाडी गोविंदा पथकाचे कमलेश भोईर यांनी माहिती दिली.

Will there be a Dahihandi festival? We will have to wait for the decision of the state government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT