varieties of birds in murgud
varieties of birds in murgud 
पश्चिम महाराष्ट्र

मुरगूडमध्ये चाळीस प्रकारचे पक्षी वैभव  

प्रकाश तिराळे

मुरगूड : येथील सरपिराजीराव तलाव व मुरगूड परीसरात प्रामुख्याने पाइंटेड स्ट्रोक, रिव्हर टर्न, ब्राउन नेकेड स्ट्रोक व ब्लॅक इबिस यांच्यासह गवताळ व जलचर, स्थानिक आणि स्थलांतरीत अशा प्रकारचे जवळपास चाळीसपेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आहेत. असे येथील सदाशिवराव मंडलीक महाविद्यालयातर्फे केलेल्या पक्षी निरीक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे मुरगूडकरांसह पर्यटक, अभ्यासक, पर्यावरण प्रेमी व पक्षी प्रेमी यांना ही एक पर्वणी ठरली आहे. 

भारतात सापडणाऱ्या 1200 जातींच्या व 2100 उपजातींच्या पक्ष्यांच्या नोंदी, त्यांच्या सवयी, अधिवास, परीसंस्था आदींची सर्वांगीण व शास्त्रशुद्ध माहिती चित्रांसहित एकाच ठिकाणी उपलब्ध करणारे महान भारतीय पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त येथील सदाशिवराव मंडलीक महाविद्यालयातर्फे पक्षी निरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. सर पिराजीराव तलाव व मुरगूड परिसरात हा पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात बी. एस्सी. प्राणिशास्त्र विभागाच्या विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी सर पिराजीराव तलाव परिसरातील व कॉलेज कॅम्पस आदी परीसंस्थानांमध्ये आढळणाऱ्या चाळीसपेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद घेतली. विद्यार्थ्यांनी पक्षी जीवनचक्र, त्यांचे पर्यावरणातील महत्व, विविध पक्ष्यांची माहिती याबाबत भित्तीपत्रके सादर केली. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, कार्यलयीन प्रमुख दिलीप कांबळे व इतर शिक्षक उपस्थित होते. 
स्पॉट बील डक, इंडियन ग्रे हॉर्नबिल, कॉमन हुपोई, स्मॉल ब्लू किंगफिशर, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, लेसर पीएड किंगफिशर, स्मॉल 'बी ईटर, ब्लू रॉक पिगेवन, कॉमन कूट, रेड वाटतलेंड लपेइंग, रिव्हर टर्न, काळी घार, ब्राह्मणी घार, लिटल कॉर्मोरांट, पर्पल हेरॉन, ग्रे हेरॉन, ब्लॅक इबिस, यूरसिण स्पून बील, जंगल क्रोव, वायर टॅलेंड स्वल्लो, रेड व्हेंटेड बुलबुल यांसह अन्य प्रकारचे पक्षी याठिकाणी आढळत असल्याचे निरिक्षणातून सिद्ध झाले आहे. यामध्ये काही पक्षी स्थलांतर करणारे आहेत व हे नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत असतात. सर पिराजीराव तलाव हा 4.5 कि.मी. पर्यंत पसरलेला आहे. त्यांचा बाजूला गवताळ परिसर आहे. त्यामुळे येथे गवताळ व जलचर पक्षी, स्थानिक आणि स्थलांतरीत अशा प्रकारचे पक्षी आढळले आहेत.

प्रामुख्याने पाइंटेड स्ट्रोक, रिव्हर टर्न, व ब्लॅक इबिस हे पक्षी संकटग्रस्त आहेत. ते सुद्धा येथे सापडतात. नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत सगळ्यात जास्त पक्षी तलाव परीसरात आढळत. हे पक्षी ओळखण्यासाठी डॉ. सलीम अली यांचे 'द बुक ऑफ इंडीयन बर्डस्' या पुस्तकाचा उपयोग केला गेला. सकाळी 7 ते 11 या दरम्यान पक्षी निरीक्षण करण्यात आले आहे. काही पक्षी हे वारंवार दिसणारे आहेत व काही फक्त सकाळीच्या वेळी आढळतात. पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिण व कॅमेरा याचा उपयोग केला असल्याचे प्राणीशास्त्र विषयाच्या प्रा. गीता काटकर व प्रा. राहुल कांबळे यांनी सांगितले. या पक्षी निरीक्षणसाठी बी. एस्सी. भाग एकच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे नियोजन बी. एस्सी. प्राणीशास्त्र विषयाच्या प्रा. गीता काटकर व प्रा. राहुल कांबळे यांनी केले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT