I phone
I phone esakal
विज्ञान-तंत्र

I-phone बनवताना स्टीव्ह जॉब्जने पाहिलेलं स्वप्नं 15 वर्षांनी पूर्ण होणार?

सकाळ डिजिटल टीम

ॲपलचा आयफोन म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी 99% लोकांना माहित असतं ते म्हणजे प्रीमियम फोन. बऱ्याच लोकांना त्याचे फीचर्सच माहीत असतात. तो एक क्वालिटी फोन आहे एवढंच माहीत असतं. पण प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. तर या फीचर्स मागे पण बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात.

तुम्हाला माहीत असेल नसेल पण आयफोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा टच स्क्रीन इंटरफेस असलेला हा एकमेव फोन होता. त्यावेळी स्टीव्ह जॉब्स म्हणाले होते की, हा स्मार्टफोन स्वतः 5 वर्ष पुढे आहे. त्यातले सर्व फिचर्स त्यावेळच्या स्मार्टफोन्सच्या तुलनेत खूपच पुढे होते.

ॲपल कंपनीला फोनमध्ये सिम कार्ड ट्रे नको होता

हा किस्सा सांगितला होता "आयपॉडचे जनक" अशी ओळख असलेल्या टोनी फॅडेल यांनी. कॉम्प्युटर हिस्ट्री म्युझियमचा एक स्पेशल इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये फॅडेल सांगत होते की, त्यावेळी आमचा आयफोन जगभरातील इतर फोन्सच्या तुलनेत खुपच पुढे होता. तेव्हा प्रत्येक फोनमध्ये सिम स्लॉट असायचं पण स्टीव्ह यांना वाटायचं की फोनवर एक होल सुद्धा खराब दिसतो.

त्यांनी त्यांच्या डिझाईन टीमला कामाला लावलं आणि सांगितलं की, जीएसएम ऐवजी सीडीएमए वर काम करा. त्यांच्या या डिझायनर्सना सुद्धा या तंत्रज्ञानाची माहिती नव्हती.

आता हे तंत्रज्ञान नेमकं काय होतं?

तर सीडीएमए म्हणजे कोड-डिव्हिजन मल्टिप्लेक्सींग. मोबाइल फोनच्या सेकंड-जनरेशन (2 जी) आणि थर्ड-जनरेशन (3 जी) च्या वायरलेस कम्युनिकेशन्समध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. वायरलेस म्हणजे यात सिम कार्डची गरज नसते.

हे तंत्रज्ञान अमेरीकेत मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. तेच जगातील बहुतेक भागात अजूनही जीएसएम तंत्रज्ञान वापरलं जातं.

म्हणजे आज ज्याप्रकारे मोबाईलचं सिम इन्सर्ट न करता फोन सुरू होतो तशी कल्पना स्टीव्ह यांना 15 वर्षांपूर्वी सुचली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT