Kopeshwar Temple esakal
टूरिझम

Kopeshwar Temple : 95 हत्तींनी उचलून धरलेलं कोल्हापूरातील “हे” मंदिर बघितलय का?

कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना

सकाळ डिजिटल टीम

Kopeshwar Temple : भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड-किल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत नमुना आहे.

शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तुंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्ये, तथ्ये ऐकली, तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा-वेरुळ लेण्यांपासून ते कान्हेरी गुंफापर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपण बघितल्या असती.

कोणतेही मंदिर उभारताना त्यात कला, स्थापत्यशास्त्र, भव्यता, संस्कृती आणि ज्या देवाशी हे मंदिर निगडीत आहे, त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात प्राधान्य दिले जाते.अगदी नावापासून ते त्या देवतेच्या शक्तीशी निगडीत सगळ्याच गोष्टींना त्यात गुंफले गेले आहे. ही मंदिरे उभारताना त्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक बाबी, गणित याचा सखोल अभ्यास केलेला आढळतो.

कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरही स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे. महादेव शिवशंकर आणि श्रीविष्णू या दोघांचे पूजन येथे केले जाते.

कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन निर्मिती केल्याचे आढळून येते. या मंदिराची निर्मिती 'शिलाहार' राजवटीत 12 व्या शतकात झाली असावी. 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. जवळपास 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे.

या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे, असे दाखवते. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

​108 खांबांचे वैशिष्ट्य

कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत. मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागलेली आहे. मात्र, या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्गमंडप स्वर्ग मंडप 48 खाबांवर उभा आहे. यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अतुच्च अविष्कारच म्हणावा लागेल.

प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. गोलाकार, चौकोनी, षट्कोन, अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या 3 वेगवेगळ्या रचना असून, हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते.

नंदीचे स्वतंत्र मंदिर!

येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्यांची समजूत काढण्यास काम श्रीहरि विष्णूंनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर.

दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून 12 किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे केवळ नंदीचे मंदिर आहे. नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

​'कट्यार काळजात घुसली'मधील शिव भोला भंडारी

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचे चित्रिकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT