धुळे येथील अर्पण रक्तपेढीचे सहकार्य, सुमारे शंभरावर दात्यांचे रक्तदान...
धुळे येथील अर्पण रक्तपेढीचे सहकार्य, सुमारे शंभरावर दात्यांचे रक्तदान... 
उत्तर महाराष्ट्र

आयोध्येतील संघर्षाच्या स्मरणार्थ शंभरजणांनी केले रक्तदान...

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे रामजन्मभूमीसाठी प्राणाचे संघर्षातील कोठारी बंधू व अशोक सिंघल यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शिवाजी रोडवरील डॉ. महेश ठाकरे यांच्या रुग्णालयात शनिवारी (ता. 18) सकाळी दहापासून सायंकाळी सहापर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात सुमारे 105 दात्यांनी रक्तदान केले. धुळे येथील अर्पण रक्तपेढीने रक्तसंकलन केले.

निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, शिवसेनेचे प्रकाश पाटील, डॉ. महेश ठाकरे आदींच्या हस्ते भारतमाता व श्रीरामाच्या प्रतिमा पूजनाने रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी सर्व रक्तदात्यांना आयोजकांतर्फे टी-शर्ट, प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला. भविष्यात देशातील कोणत्याही गरजू रुग्णास रक्ताअभावी आपल्या प्राणास मुकावे लागू नये म्हणून हे शिबीर घेण्यात आले. दरवर्षी 2 नोव्हेंबरला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे देशभरातून एक लाख बॉटल रक्त संकलित केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून हे शिबीर घेण्यात आले. त्याला परिसरासह दोन्ही गावांतून उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विशाल विसपुते, सहसंयोजक ऍड. विशाल पिंपळे, जिल्हा आखाडा प्रमुख दिनेश बोरसे, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे स्थानिक कार्यकर्ते सदा महाजन, उमेश नेरकर, सतीश गवळे, प्रकाश मिश्रा, करण पवार, कमलेश भामरे, महेश खैरनार, धुळे येथील अर्पण रक्तपेढीचे पथकप्रमुख कैलास राठोड आदींनी परिश्रम घेतले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT