नंदुरबार : गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर नंदुरबारकरांना वेध असते ते पंतगोत्सवाचे. नववर्षासोबतच थंडीच्या शेवटच्या टप्प्यातील गोडगुलाबी थंडी अंगाला झोंबत असताना येणारा मकरसंक्रांत सण म्हणजे तरुणाईसाठी खास ठरतो, तो पंतगोत्सावासाठी.
नंदुरबार शहर गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. जिल्हा आदिवासीबहुल लोकसंख्येचा असला, तरी येथे खानदेशातील सण-उत्सवासोबतच अनेक सण गुजरात-मध्य प्रदेशातील रीतीरिवाजाप्रमाणे साजरे केले जातात. (Vendors ready for kite Sale on occasion of Makar Sankranti Ban on Nylon Manja Police administration municipal teams ready for action Nandurbar News)
त्यात नवरात्र व पतंगोत्सवाचे खास आकर्षण ठरते. त्यामुळे हे दोन्हीही सण तरुणाईसाठी आनंदपर्वणी ठरतात. थंडीच्या वातावरणात अंगाला झोंबणारा गार वारा व हवेच्या झुळकेसोबत पंतग उंच उंच आकाशात उडविण्याचा आनंद मकरसंक्रांतीला पहाटेपासूनच घेण्यास सज्ज होतात.
टेरेसवर डीजे, साउंड सिस्टिमसह नव्या-जुन्या गाण्यांच्या तालावर नाचत ‘काटे...काटे..., ढील दे दे रे बाबा...’ अशा एक ना अनेक प्रकारच्या आरोळ्या मारत जल्लोष करत असतात. त्यामुळे मकरसंक्रांतीचा दिवस पहाटे तीनपासून तर रात्री बारापर्यंतचा सर्वाधिक मोठा दिवस तरणाईसाठी ठरतो. टेरेसवरच चहा-नाश्ता व जेवणाचा बेत ठरलेला असतो.
त्यामुळे या उत्सवात पतंग व मांजा विक्री व्यवसायाला खूपच उधाण आलेले असते. कोट्यवधींची उलाढाल पतंग व मांजा विक्रीतून होते. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या १५ दिवसांपूर्वीच शहरात विक्रेते दुकाने थाटतात. त्यामुळे उलाढाल वाढते.
सध्या शहरातील वसाहतींमध्ये पतंग व मांजा विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. मात्र येथील अमर व अमृत चित्रमंदिराच्या रस्त्यावर पतंग व मांजा विक्रीची स्वतंत्र बाजारपेठच तयार होते. सध्या येथे शेकडो दुकाने थाटून सज्ज झाली आहेत.
मांजा तयार करण्यापासून तर त्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले आहे. पतंगोत्सव मकरसंक्रातीला असतो, तरीही या व्यवसायामुळे शेकडो बेरोजगारांना काम मिळत असते. येथे सुरत, अहमदाबाद, इंदूर येथून पतंग व मांजा विक्रेते मागवत असतात.
नायलॉन मांजावर बंदी
पतंगोत्सवात नायलॉन मांजा हा पक्का असतो. पतंग काट करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. इतर मांजा त्या तुलनेत लवकर तुटतो. त्यामुळे नागरिक-मुले पारंपरिक धागा सोडून नायलॉन धागा वापरतात. मात्र नायलॉन धागा मानव व पशु-पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे प्रशासनाने नायलॉन मांजावर पूर्णतः प्रतिबंध घातला आहे.
त्यासाठी पोलिस प्रशासनानेही आवाहन करीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच नंदुरबार नगर परिषदेचे स्वतंत्र पथक नायलॉन धागा विक्री प्रतिबंध करण्यासाठी सज्ज झाले आहे. मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मंगळ बाजार परिसर, अमर टॉकीज परिसर येथील धागा विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकून तपासणी केली जात आहे. पथकात आरोग्य निरीक्षक रवी काटे, मनोज पिंपळे, विशाल कांबळे आदींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.