Falling plaster of slap in Zilla Parishad School and leaky classroom due to rain. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP News : जि. प. शाळेची इमारत धोकादायक; एकाच वर्गात भरतात 3 इयत्तांचे वर्ग

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP News : बसरावळ (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या पहिल्याच पावसात गळू लागल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय, स्लॅपचे प्लास्टरही धोकादायक स्थितीत आहे, वर्ग खोल्यांची दुरवस्था असल्याने अनेक वर्गांचे विद्यार्थी एकाच वर्गात बसविले जात आहे.

त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना अभ्यास समजवणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (ZP School is dangerous dhule news)

बसरावळ (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कमी असल्याने एका खोलीत तीन वर्ग भरवले जातात, अशीच परिस्थिती पश्चिम पट्ट्यासह पिंपळनेर परिसरात अनेक जिल्हा परिषद शाळांची आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच, अनेक खासगी शाळा १५ जूनपासून पुन्हा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

मुलांना शिक्षण आनंददायी वाटावे आणि शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र, साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या बसरावळ (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळा अपवाद ठरली आहे. वर्ग खोल्या स्लॅपचे प्लास्टर मटेरिअल पडल्याने पहिल्याच पावसात शाळेचे छत गळू लागले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे शाळेतील स्लॅपसह भिंतीही जीर्ण झाल्या आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच, या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. मात्र, या ठिकाणी पाच शिक्षकांऐवजी तीनच शिक्षक असल्याने एका खोलीत तीन-तीन इयत्तेचे वर्ग भरवले जातात यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणे जिकरीचे व विद्यार्थ्यांना अभ्यास समजणे अवघड झाले आहे. सिताडीपाडा (ता. साक्री) या जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीही गळत आहेत. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी पालक करीत आहे.

"पावसाळा सुरू झाला असून दोन वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचत आहे. तरी त्या दुरुस्त करण्यात याव्यात. तसेच, शिक्षक कमी असल्याने एका खोलीत तीन वर्ग भरवावे लागत असून विद्यार्थ्यांना अभ्यास समजवणे कठीण होते. शिक्षकांचीही व्यवस्था व्हावी." -देवजी कुवर, मुख्याध्यापक जि. प. शाळा बसरावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कारला धडकल्यानंतर पिकअपला लागली आग; तिघांचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची आज कोल्हापुरात महासभा

Supreme Court : 'its very serious issue' सर्वोच्च न्यायालयात वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद, CJI सूर्यकांतही संतापले, खटला अतिशय गंभीर

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

Semiconductor : सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये ‘स्वदेशी’ झेप; मायक्रोप्रोसेसर ‘ध्रुव-६४’चे लाँचिंग, ‘सीडॅक’ने बनविला आराखडा

SCROLL FOR NEXT