बालकांसाठीच्या चित्रपटांना व्यावसायिक यशाचा अभाव

बालकांसाठीच्या चित्रपटांना व्यावसायिक यशाचा अभाव
बालकांसाठीच्या चित्रपटांना व्यावसायिक यशाचा अभाव

पणजी (गोवा): व्यावसायिक यश आणि सृजनशीलतेचा अभाव या बाबींमुळे चित्रपट निर्माते बालकांसाठी चित्रपट बनविण्यासाठी फार उत्सूक नसतात. निर्मितीचा खर्च हा आता चित्रपटाच्या कथानकावर नाही तर त्या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत यावर अवलंबून असतो, अशी माहिती दिग्दर्शक आणि निर्माते नितेश तिवारी यांनी आज (बुधवार) येथे दिली.

पणजीत सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज भारतीय चित्रपट सृष्टीतील बाल चित्रपट या विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले. इफ्फी 2017 च्या संचालन समिती सदस्या वाणी त्रिपाठी आणि इफ्फी 2017 चे संचालक सुनित टंडन यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात चित्रपट परीननिरीक्षण मंडळाचे प्रमुख प्रसून जोशी, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते नितेश तिवारी, ग्रीन गोल्ड निमेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चिलका, डिस्नेच्या कार्यकारी संचालक देविका प्रभू सहभागी झाल्या होत्या. बालचित्रपट हे मुलांवर असतात की,मुलांसाठी असतात या प्रश्नाचे उत्तर देतांना नितेश तिवारी यांनी सांगितले की, हे त्या विषयावर आणि चित्रपट कोणत्या उद्देशाने तयार केले आहेत यावर अवलंबून असते. तिवारी पुढे म्हणाले की, तारे जमीन पर सारखा चित्रपट शिक्षण पध्दतीवर लक्ष केंद्रीत करणारा होता जो करमणुकीच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता. चिल्लर पार्टी चित्रपट हा बालकांना केंद्रस्थानी ठेवून बनविण्यात आला होता पंरतु हा चित्रपट सर्वांनाच खूप आवडला. आपण मुलांसाठी अधिकाधिक चित्रपटांची निर्मिती केली पाहिजे.

या चर्चासत्रात सहभागी झालेल्या तज्ञांनी बालक आणि युवकांसाठीच्या चित्रपट निर्मितीच्या महत्वावर विशेष प्रकाशझोत टाकला. वेगाने बदलणाऱ्या काळात सिनेमा सावधरितीने विकसित होत गेला आहे यावर देखील या तज्ञांनी मार्गदर्शन केले. मागील अनेक वर्षांपासून बाल चित्रपटांनी अनेक चढउतार पाहिले आहे, असे असले तरीही या चित्रपटांनी आपली उपयुक्तता कमी होऊ दिली नाही तसेच करमणुकीमध्ये देखील काही कमतरता येऊ दिली नाही.

नितेश तिवारी, राजू चिलका आणि देविका प्रभू यांच्यासोबत प्रसून जोशी यांनी हे चर्चासत्र उत्तम रित्या हाताळले. मुलांवरील चित्रपट आणि मुलांसाठीचा चित्रपट या दोन्ही संकल्पनांचे उत्तमरित्या स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले.

हैद्रराबादस्थित ग्रीन गोल्ड निमेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चिलका म्हणाले की, मुलांचे विश्व हे विलक्षण आहे आणि बाल चित्रपटांविषयीच्या चर्चा सत्रामध्ये इतके लोक उपस्थित झालेले पाहून खरच आनंद होत आहे. दूरचित्रवाणीचा 50 टक्के प्रेक्षक हा 14 वर्षांखालील असतो. त्यामुळे लहान मुलांवर आधारित कार्यक्रम निर्मितीसाठी खूप वाव आहे. आपण सर्वांसाठी विशेषत: मुलांसाठी चित्रपट निर्मिती केली पाहिजे ज्याचा आस्वाद सर्वजण घेऊ शकतील.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com