कांगारुंची जिरवण्यापासून ते नेताजींच्या पराक्रम दिवसापर्यंत; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 19 January 2021

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी तांडववर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या आमदार आणि काही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. त्यात आता अभिनेत्री कंगणा राणावतची भर पडली आहे. अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंची ग्रामपंचायतींच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 31 जानेवारीपर्यंत राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. 

Aus vs Ind: कांगारुंच्या बाल्लेकिल्ल्यात टीम इंडियाने रचला इतिहास; मालिका 2-1 ने जिंकली
भारताने औस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 328 धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या दिवसाअखेर टिम इंडियाने बिन बाद 4 धावा केल्या होत्या. सविस्तर बातमी-
https://www.esakal.com/krida/team-india-won-4th-test-against-australia-b...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी होईल नेताजींची जयंती

केंद्र सरकारने मंगळवारी महान स्वातंत्र्य सेनानी आणि आझाद हिंद फौजचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमी-

प्रचाराला गावात न फिरला..न मतदान केले; तरी 'तो' निवडणूकीत विजयी झाला, हे कसे झाले शक्य ? वाचा सविस्तर

तालुक्यातील बक्षीपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दुसऱ्या प्रभागातून स्वप्नील मनोहर महाजन हा युवक उमेदवार नाशिक येथील तुरुंगात असताना देखील प्रचंड मतांनी विजयी झाला आहे. सविस्तर बातमी-

'अली जाफर, है हिम्मत अल्लाह का मज़ाक़ उड़ाने की ?'

तांडव मालिका प्रदर्शित झाली त्यानंतर ज्याप्रकारे वादाला सुरुवात झाली तो वाद टोकाला जाऊन पोहचला आहे. गेल्य़ा आठवडाभरापासून त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारे टीका त्या मालिकेवर होऊ लागली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी तांडववर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या आमदार आणि काही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. त्यात आता अभिनेत्री कंगणा राणावतची भर पडली आहे. सविस्तर बातमी-

अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंची ग्रामपंचायतींच्या निकालानंतर पहिली प्रतिक्रिया... ; आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही 

मागील काही दिवसांपासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चर्चेत आहेत. मुंडे यांच्यावर रेणू शर्माच्या बलात्काराच्या आरोपाने बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. सविस्तर बातमी-

Farmers Protest : 'आम्ही कोर्टाकडे गेलो नव्हतो, संसदमार्गे आलेले कायदे त्याच मार्गाने जातील'

सरकार आणि शेतकरी संघटना यांच्या दरम्यान होणारी चर्चेची 10 वी फेरी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ती आता 19 जानेवारी ऐवजी 20 जानेवारी रोजी होणार आहे. सविस्तर बातमी-

कोरोना लस घेण्यापूर्वी भरावं लागतं संमतीपत्र? नेमकं काय लिहिलंय यात

देशात आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लस देण्यापूर्वी कंपनीकडून एक संमतीपत्र लिहून घेतलं जात आहे. सविस्तर बातमी-

टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीने BCCI खूष; जाहीर केलं कोट्यवधींचं पॅकेज

ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला आहे. तब्बल 32 वर्षांनी हा योग घडून आला आहे. भारतीय क्रिकेट संघाने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर बीसीसीआयनेही संघाला गोड बातमी दिली आहे. सविस्तर बातमी-

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांचं नाव आघाडीवर

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नसताना आताच आलेल्या माहितीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याचं समजतंय. सविस्तर बातमी-

इम्रान खान यांच्यावर प्रचंड दबाव; 31 जानेवारीपर्यंत देणार राजीनामा?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर 31 जानेवारीपर्यंत राजीनामा देण्याचा दबाव वाढला आहे. 11 विरोधी पक्षांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने यासाठी आपली सर्व शक्ती लावली आहे. सविस्तर बातमी-

Aus vs Ind 4th Test : शुभ दिन! गिल, पंत-पुजाराच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेमध्ये उधळला गुलाल

ब्रिस्बेनच्या निर्णायक कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद करत मालिका 2-1 अशी जिंकली. सविस्तर बातमी-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news maharashtra india win cricket netaji dhananjay munde tandav