भारत बंदला चांगला प्रतिसाद ते रेल्वे स्थानकावर सापडली स्फोटकं; ठळक बातम्या एका क्लिकवर

afternoon_
afternoon_

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड अधिवेशनाच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका गाडीमध्ये स्फोटकं आढळल्याची घटना घडल्यानंतर आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. केरळच्या कोझीकोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आला. रेल्वेच्या सुरक्षा बलाने ट्रेनमधून 100 हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि 350 डिटोनेटर जप्त केले आहेत. जीएसटी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात अशी व्यापारी संघटनांची मागणी आहे, त्यासाठी आज देशभरात व्यापारी संघटनांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे.
केरळ-  केरळच्या कोझीकोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकाचा साठा जप्त करण्यात आला.. वाचा सविस्तर-

देश- 3.45 मिनिटाला हवाईदल प्रमुख बीएस धनोआ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना विशेष RAX क्रमांकावर कॉल करुन'बंदर मारा गया' असं सांगितलं.  वाचा सविस्तर-

देश-  देशभरातील व्यापाऱ्यांनी आज (२६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद आज सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहे.वाचा सविस्तर-

पुणे- पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेला सराईत गुन्हेगार गजा मारणे याच्यावर तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.. वाचा सविस्तर-

मुंबई- राखी सावंत 'बिग बॉस १४'च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. मात्र १४ लाख रुपये स्वीकारून तिने तिथून माघार घेतली.. वाचा सविस्तर-

मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राठोड यांची कानउघडणी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर-

मुंबई- रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली.. वाचा सविस्तर-

अर्थ- शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 900 पेक्षा अधिक अंकाची घट पाहायला मिळाली.. वाचा सविस्तर-

सातारा- कोविड 19 चे नियम सर्वांना पाळावेत आणि काळजी घ्यावी असा सल्ला देत उदयनराजेंनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करुन परगावी जाणे पसंत केले  वाचा सविस्तर-

विदेश-  इराणसोबत अणु करारावर झालेल्या वादानंतर अमेरिकेनं इराणचा प्रभाव असलेल्या मिलिशियातील अनेक ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहेवाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com