
पुण्यात आज, पोलिसालाच धमकावण्याचा प्रकार घडलाय. शरद पवारांच्या पुणे ते शिवनेरी सायकल प्रवासाचा किस्सा चर्चेत आहे. या सगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत.
ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर आज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये होते. पुण्यात आज, पोलिसालाच धमकावण्याचा प्रकार घडलाय. शरद पवारांच्या पुणे ते शिवनेरी सायकल प्रवासाचा किस्सा चर्चेत आहे. या सगळ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत.
जोधपूर : ज्येष्ठ उद्योजक आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) वड्रा यांच्याविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सविस्तर वाचा
नवी दिल्ली : कोरोना काळात उपाययोजना आणि मदतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘पीएम केअर फंडा’च्या (pm care fund)पारदर्शकतेबद्दल सेवानिवृत्त झालेल्या १०० सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, यात जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा
नवी दिल्ली : एखाद्या रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तीच्या पालकांना नुकसान भरपाईची अधिकार आहे, असा निकाल हायकोर्टाने दिला असून, या निकालाची प्रत सर्व मोटार अपघातात न्यायाधिकरणांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा
बेळगाव : देशात पंतप्रधान नरेंद्र आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची डबल इंजिन जोडी प्रभावी ठरल्याचे गौरद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढून घेतली आहे. सविस्तर वाचा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न राज्यभरात घोंगावत आहे. त्यावरू सत्ताधारी, विरोधक आणि नामांतराला विरोध करणारे आपापल्या भूमिका जाहीर करताना दिसत आहेत. सविस्तर वाचा
पुणे : भांडणाच्या घटनेची परस्परविरोधी तक्रार लिहून घेणाऱ्या पोलिसालाच एकाने थेट नोकरी घालविण्याची धमकी देत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सविस्तर वाचा
बारामती: मलाही जेव्हा विविध ठिकाणी जायचे असते तेव्हा, मी विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळत रस्त्याच्या मार्गाने जातो. निसर्गाच्या सहवासात तुम्ही जितके जाल तितकी तुमची प्रगल्भता वाढेल. असा कानमंत्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा खेळाडूंना दिला. सविस्तर वाचा
मुंबई- राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. शिवसेनेने त्यानंतर बिहार आणि इतर निवडणूकांमध्येही आपले उमेदवार निवडणूकांच्या रिंगणात उतरवले होते. सविस्तर वाचा
तासगाव (सांगली): आटपाडी येथे केमिस्ट असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना मैदानातच ढवळी (ता. तासगाव) येथील अतुल विष्णू पाटील (वय ३२) या औषध विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वाचा
उमरगा (उस्मानाबाद): दुसरीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाना प्रकारचे काम करणाऱ्या फिरस्ती समाजाची होणारी अवहेलना सामाजिक विषमतेची दरीचे वास्तव चित्रण मन हेलावून टाकणारे आहे. सविस्तर वाचा