राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका ते राऊतांची गाझीपूर बॉर्डर भेट; वाचा एका क्लिकवर

टीम-ईसकाळ
Tuesday, 2 February 2021

दिल्लीत बर्ड फ्लू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यानंतर राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील असं म्हटलं आहे. दरम्यान, दिल्लीत बर्ड फ्लू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

नवी दिल्ली :  दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत गाझीपूर इथं पोहोचले होते. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली असून 'म्हारो टिकैत' असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर 

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं असून शेतकऱ्यांचं आंदोलन ऑक्टोंबर पर्यंत चालेल असं म्हटलं आहे. वाचा सविस्तर

सांगली : शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाची घोषणा करून जेष्ठ समजासेवक अण्णा हजारे यांनी माघार घेतली. यावरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी घणाघाती टीका केली. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटलं की, लाल किल्ला अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांसाठी बंद केला जात आहे.  वाचा सविस्तर

पुणे : कोरोनासह विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने मंगळवारी (ता. २) आदेश जारी केले.  वाचा सविस्तर

मुंबई : शरजिल उस्मानने हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी  फडणवीस यांनी एल्गार परिषद आणि ठाकरे सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. वाचा सविस्तर

मुंबई :  'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांचा प्राजक्ता गायकवाडशी झालेला वाद जगजाहीर आहे. आता याबाबत अलका कुबल यांनी व्यथा मांडली आहे. वाचा सविस्तर

CBSE Board Exam Date Sheet 2021 : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी डेटशीट प्रसिद्ध केली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : अर्थसंकल्पावर एका वृत्त वाहिनीवरील संवादादरम्यान भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांच्यात जबरदस्त वाद झाला  वाचा सविस्तर

मुंबई : मुंबईतील एका महिलेनं तक्रार दिली असून तिनं म्हटलं आहे की, मिंत्रा चा लोगो हा महिलांसाठी आक्षेपार्ह आहे. मिलिंद सोमणनं यावरून केलेल्या कमेंटमुळे आता त्याला ट्रोलर्सना तोंड द्यावं लागत आहे. वाचा सविस्तर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news delhi sanjay raut rakesh tikait maharashtra election milind soman devendra fadanvis