मुंडेंवर पुन्हा खळबळजनक आरोप ते सरकार आणि शेतकऱ्यांची बैठक; वाचा एका क्लिकवर

मुंडेंवर पुन्हा खळबळजनक आरोप ते सरकार आणि शेतकऱ्यांची बैठक; वाचा एका क्लिकवर

गेल्या चार दिवसांपासून राज्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपामुळे वातावरण तापलं आहे. यातच इतर काही लोकांनीही आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार केल्यानंतर प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असताना संबंधित महिलेनं टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा खळबळजनक आरोप केले आहेत. दरम्यान, राज्यात 5 वी चे 8 वीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर दिल्लीत शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली 9 वी बैठकही कोणत्याही तोडग्याशिवाय संपली. 

1. राज्यात 5 वी ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 
राज्यातील पाचवी ते 8 वीची शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सविस्तर वाचा

2. 'फिर मिलेंगे!'; शेतकरी आणि सरकारमधील ९वी बैठकसुद्धा निष्फळच!
राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी (ता.१५) शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली ९वी बैठक विज्ञान भवन येथे बोलावण्यात आली होती. सविस्तर वाचा

3. 'धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा'; उच्च न्यायालयात जनहित याचिका लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी कौग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सविस्तर वाचा 

4. 'आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंडे यांनी माझ्यावर वेळोवेळी अत्याचार केले'; रेणू शर्माचे पुन्हा खळबळजनक आरोप 
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर लैगिक छळाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. सविस्तर वाचा

5. Breaking : पुण्यातील सहकारी बॅंकेवर 'ईडी'चा छापा; कसून सुरूय झाडाझडती!
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (ता.१५) सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. सविस्तर वाचा

6. लस टोचल्यानंतर आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू; नॉर्वेमध्ये खळबळ
नॉर्वेच्या मेडिसिन एजन्सीचे मेडिकल डायरेक्टर स्टीनर मॅडसन यांनी सांगितलं की, आम्हाला याची माहिती घ्यावी लागेल की व्हॅक्सिनमुळे त्यांचा मृत्यू झाला की हा फक्त योगायोग आहे. सविस्तर वाचा

7. पाकिस्तानची नाचक्की! मलेशियानं जप्त केलं प्रवासी असलेलं विमान 
मलेशियाच्या स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार हे विमान जप्त करण्यात आलं आहे. मलेशियाने उचललेलं हे पाऊल आपल्याला मान्य नसल्याचं PIA ने म्हटलं आहे. सविस्तर वाचा

8. माध्यम निर्मित माया लवकरच संपेल; पत्रकाराच्या प्रश्नावर राहुल गांधींचे उत्तर
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आणि शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. सविस्तर वाचा

9. एक गाव असंही! मतदार सोडा उमेदवारांनीसुद्धा दिलं नाही मत; एकूण मतदान शून्य
एक गाव असंही! मतदार सोडा उमेदवारांनीसुद्धा दिलं नाही मत; एकूण मतदान शून्य सविस्तर वाचा 

10. VIDEO - 'बदन पे सितारे लपेटे हुए', शिल्पा शेट्टीचा बहिणीसोबत कपल डान्स
लॉकडाऊनच्या काळात शिल्पा शेट्टीने तिच्या घरात काम करत असताना, व्यायामाचेही व्हिडिओ शेअऱ केला होते. आता शिल्पा शेट्टीने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. सविस्तर वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com