esakal | महाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत ते अमेरिकेत पुन्हा गोळीबार; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast News latest news

राज्यासह देश, विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत ते अमेरिकेत पुन्हा गोळीबार; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून देशातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत चालली आहे. यातही देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसात ४ हजारांहून अधिक मजले सील करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून आर्थिक व्यवहार उघड करणारी डायरी हाती लागली आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. कोलोरॅडोतील सुपरमार्केटमध्ये झालेल्या या गोळीबारात पोलिस अधिकाऱ्यासह दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Sachin Waze Case - NIAची पंचतारांकित हॉटेलमध्ये शोधमोहिम, दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 14 सिमकार्ड पुरवणाऱ्या एकाला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर

Sachin Waze: 'ती' संशयित डायरी उलगडणार `अर्थ`पूर्ण व्यवहार? राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) हाती लागलेली संशयित डायरी या आर्थिक व्यवहार उघड करण्याची शक्यता आहे. डायरीतील नोंदी महत्त्वूपूर्ण ठरणार आहेत. वाचा सविस्तर

कोरोना नियंत्रणासाठी सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन न केल्यास पुन्हा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पुण्यात दिले. वाचा सविस्तर

Corona Update: राज्याची स्थिती अद्यापही चिंताजनक - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे आढळत आहे. रविवारी राज्यात 30 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले होते. वाचा सविस्तर

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून यात चाळी आणि झोपडट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.  गेल्या काही दिवसांत 4746 मजले तर 302 इमारती सील करण्यात आल्या. वाचा सविस्तर

भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी गांधी शांतता पुरस्कारांची घोषणा केली. 2020 साठीच्या पुरस्कारासाठी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची तर 2019 च्या पुरस्कारासाठी ओमानचे दिवंगत सुल्तान काबूस बिन अल सैद यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. वाचा सविस्तर


तेलंगणा राज्याच्या सूर्यापेट येथे कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अचानक गॅलरी कोसळली. या दुर्घटनेत जवळपास १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. वाचा सविस्तर

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये पोलिस अधिकाऱ्यासह दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोलोरॅडोतील सुपरमार्केटमध्ये एकाने बेछूट गोळीबार केला. वाचा सविस्तर

सनदी लेखापाल (सीए)सारख्या अत्‍यंत कठीण परीक्षेत यश मिळविणे तसे आव्‍हानात्‍मकच. अत्‍यंत सामान्‍य कुटुंबातील पूजा माणिकलाल दिवटे हिने प्रसंगी घरातील स्‍वयंपाकगृहात अभ्यास करत खडतर प्रवास पूर्ण करताना सीएच्‍या अंतिम परीक्षेत यश मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. वाचा सविस्तर

मराठी अभिनेत्रींना त्यांच्या पोशाखावरून फार ट्रोल केलं जातं. पण मराठी अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करू शकत नाही का, असा सवाल तेजस्विनी पंडितने ट्रोलर्सना केला. वाचा सविस्तर

loading image