ब्रेकफास्ट अपडेट्स: पेट्रोलच्या दरात वाढ ते ब्रिस्बेनमध्ये गिलचा धमाका; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Morning-News
Morning-News

गुजरातमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. 13 मजुरांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. स्वदेशी भारत बायोटेकने लोकांना सतर्क केले आहे. काही विशिष्ठ लोकांनी कोरोनाची लस घेऊ नये असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. विदेशात, नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कॅपिटॉलमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

सूरत : गुजरातमध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडलीय. सूरतमधील कोसांबामध्ये एका ट्रकने 13 लोकांना चिरडून टाकलं आहे. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे मजूर होते. तसेच ते राजस्थानचे रहिवासी होते. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर शपथविधीवरही हल्ल्याचे सावट असताना, हा हल्ला अंतर्गत यंत्रणेतील अथवा सुरक्षा रक्षकांपैकीच कोणाकडून तरी होण्याची शक्यता असल्याचे येथील सैन्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने दोन लशींचा आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आज परत एकदा वाढ झाली आहे. आज डिझेलच्या किंमतीत 24 चे 25 पैशांची वाढ झाली आहे. सविस्तर वाचा 

मुंबई  : अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला असून, केवळ या वर्षासाठीच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून वगळलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे. सविस्तर वाचा 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने यासंदर्भात ट्विट केले आहे. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सर्व प्रयत्न केले. पण गिल है की मानता नहीँ, अशीच प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अवस्था झाली, असे ट्विट सेहवागने केले आहे.सविस्तर वाचा

ब्रिस्बेनच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील फायनल दिवस निकाली लावण्याच्या इराद्याने रोहित शर्मा 4 आणि शुभमन गिल ० यांनी खेळाला सुरुवात केली. सविस्तर वाचा 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १९ जानेवारी २०२१
मंगळवार : पौष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ७.११ सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ११.२९, चंद्रास्त रात्री ११.५३, बांगर षष्ठी, भारतीय सौर पौष २८ शके १९४२. सविस्तर वाचा 

नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी १०० कोटी खर्चून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची श्रेणीवर्धन करण्याची घोषणा २०१७ मध्ये केली होती. २०१९ पर्यंत सत्तेवर फडणवीस सरकार होते. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 21 हेलिकॉप्टरसहित 15 लढाऊ विमाने आपली कसरत दाखवणार आहेत. परेडमध्ये कसल्याही प्रकारची चूक होऊ...  सविस्तर वाचा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com