esakal | राष्ट्रवादीचे नेते गोत्यात ते ट्रम्पना यूट्यूबचा दणका; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Duparachta Batamya

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुंबईमध्ये २०० किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर समीर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते गोत्यात ते ट्रम्पना यूट्यूबचा दणका; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुंबईमध्ये २०० किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर समीर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. - सविस्तर वाचा

जिया खानच्या आत्महत्येवर बीबीसीकडून ' डॉक्युमेंटरी'
जगातील जे सर्वोत्तम माहितीपट तयार केले गेले आहेत त्याच्या निर्मिती प्रक्रियेत बीबीसीचे योगदान महत्वाचे आहे. विषयाची निवड, त्यात केलेले संशोधन, त्यासाठी केलेली मेहनत, पुराव्यांची करण्यात आलेली पडताळणी, त्यानुसार संहितेचे लेखन करणे यामुळे बीबीसीचे नाव अद्याप टिकून आहे. - सविस्तर वाचा

"दिवस आनंदाचा, मात्र महाराष्ट्राला अपेक्षेप्रमाणे कोरोनाचे डोस मिळाले नाहीत" : राजेश टोपे
कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहिलेल्या मुंबईत अखेर कोरोना लसींचे डोस पहाटे साडे पाच वाजता दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील आज कोरोनाची लस पोहोचतेय. - सविस्तर वाचा

शेतकऱ्यांनाही मिळणार प्रत्येक महिन्याला पेन्शन; जाणून घ्या फायद्याची योजना
नोकरी करणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते, त्यामुळे त्यांना काही अडचणी येत नाहीत. शेतकऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकते. - सविस्तर वाचा

ट्विटर, फेसबुकनंतर यूट्यूबचाही ट्रम्पंना दणका; हिंसेच्या भीतीने घातली बंदी
फेसबुक आणि ट्विटरनंतर आता यूट्यूबने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक आठवड्यासाठी बॅन लावला आहे. ऑनलाईन आणि व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या या बंदीमागे हिंसा पसरण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. - सविस्तर वाचा

'गोडसे स्टडी सर्कल'चा दोन दिवसांत गुंडाळला गाशा; बॅनरसकट साहित्य जप्त, प्रशासनाची कारवाई
अवघ्या दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेकडून सुरु करण्यात आलेलं 'गोडसे स्टडी सर्कल' आता गुंडाळण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे ही 'गोडसे ज्ञानशाळा' उघडण्यात आली होती. - सविस्तर वाचा

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील, सचिन सावंत यांची खोचक टीका
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं. - सविस्तर वाचा

पीकविम्याबाबत लवकरच नवीन धोरण हाती घेणार - दादा भुसे
पीकविम्याबाबत राज्य शासन केंद्राच्या मदतीने लवकरच नवीन धोरण हाती घेणार असून, केंद्र सरकारची विमा कंपनी स्थापन होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. - सविस्तर वाचा

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रत्येक महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले आहेत. या लशीचे भारताप्रमाणेच परदेशातही वितरण करण्यात येईल. सध्या याचेच नियोजन आखले जात आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. - सविस्तर वाचा

पुणे जिल्ह्यातील यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज
पुणे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता. १३) कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस मिळतील. त्यानंतर तेथून पुढील दोन दिवसांमध्ये ते केंद्रांपर्यंत पोचविण्यात येणार असून, येत्या शनिवारी (ता. १६) होणाऱ्या लसीकरणासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

loading image