esakal | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ते मोदींच्या कौतुकाने काँग्रेस कार्यकर्ते भडकले; वाचा एका क्लिकवर

बोलून बातमी शोधा

afternoon.}

राज्यसह देश, विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचा एका क्लिकवर

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ते मोदींच्या कौतुकाने काँग्रेस कार्यकर्ते भडकले; वाचा एका क्लिकवर
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करताना कोणाचेही वीज कनेक्शन कापले जाणार नाही असं जाहीर केलं आङे. तसंच यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे आभारही मानले. हाथरसमध्ये मुलीची छेड काढली म्हणून तक्रार केल्याच्या कारणावरून वडिलांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे, जम्मूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात निदर्शने करताना पुतळा जाळला आहे. 

मुलीची छेड काढल्याची तक्रार केल्यानं वडिलांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं हाथरसमध्ये खळबळ उडाली आहे. नौरजपूर गावात एका तरुणाने सहकाऱ्यांसह 52 वर्षीय शेतकऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. वाचा सविस्तर-

राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीला एकत्रित करुन 'संसद टीव्ही' केलं गेलं आहे. याचा अर्थ असाय की आता दोन्हीही सदनांची कार्यवाही देशवासीयांना संसद टिव्हीवर पहायला मिळणार आहे.  वाचा सविस्तर-

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांशी संवाद साधला. तसंच चहाच्या मळ्यात महिला कर्मचाऱ्यांसोबत पारंपरिक पद्धतीनं चहाची पानेही तोडली. प्रियांका गांधी यांची एक रॅलीसुद्धा होणार आहे.  वाचा सविस्तर-

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.  वाचा सविस्तर-

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.  वाचा सविस्तर-

जम्मूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात निदर्शने करताना पुतळा जाळला आहे. वाचा सविस्तर-

हरियाणा, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये हा कडक आणि तीव्र उन्हाळा असण्याची शक्यता IMD अर्थात भारतीय हवामान खात्याने सोमवारी वर्तवली आहे.  वाचा सविस्तर-

बीएमसीने सप्टेंबर 2020 मध्ये कंगनाचे मुंबईमधील 'मणिकर्णिका' हे ऑफिस तोडले होते. त्यानंतर 6 महिन्यांनी कंगना ऑफिसला भेट दिली. ऑफिसची पाहणी करत असलेले फोटो आणि ऑफिस तोडायच्या आधीचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट केले..  वाचा सविस्तर-

एक कप चहाची किंमत किती असू शकते? 5 ते 10 रुपये किंवा फार तर दोन अडीचशे.. पण एक चहा असा आहे ज्याचा एक कप 1000 रुपयांना मिळतो.  वाचा सविस्तर-

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्याच्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  वाचा सविस्तर-