esakal | राज्यात लग्नासाठी 2 तास ते मुंबईत बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार, ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
राज्यात लग्नासाठी 2 तास ते मुंबईत बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाखांच्यावर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6,01,590 झाला आहे. दुसरीकडे देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मनात धडकी भरवणारी आणि सर्वसामान्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांची काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मनात धडकी भरवणारी आणि सर्वसामान्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांची काळजी वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. नव्या रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. देशात बुधवारी दिवसभरात सुमारे 3 लाख 15 हजार 802 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. या आधी अमेरिकेत 8 जानेवारीला जगात सर्वाधिक 3 लाख 7 हजार रुग्ण आढळून आले होते. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गुरुग्राममधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सीताराम येचुरी यांनी टि्वट करुन यासंबंधी माहिती दिली आहे. आशिष हे पत्रकार म्हणून काम पाहत होते. वाचा सविस्तर

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाखांच्यावर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6,01,590 झाला आहे. मुंबईत बुधवारी 7684 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा 84 हजार 743 हजारांवर आला आहे. वाचा सविस्तर

मुंबई - कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आज रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असेल. राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लोकल, मेट्रो, मोनो प्रवासात फक्त सरकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि गंभीर रुग्णांना उपचार घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार रेल्वे, मेट्रो, मोनो प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. वाचा सविस्तर

मुंबई - कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने नवे नियम तयार केले आहेत. लोकल, मेट्रो मोनोतून केवळ अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येईल. सरकारी कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचारी कामावर राहणार असून लग्न समारंभाला केवळ २५ जणांना हजर राहता येईल. अत्यावश्यक सेवांसाठी ही मर्यादा ५० टक्के एवढी असेल. आंतरजिल्हा वाहतूक देखील सबळ कारण असेल तरच करता येईल असेही सरकारकडून प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. वाचा सविस्तर

पुणे - शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनसाठी आम्ही निधी देऊ, पण दोन्हींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. वाचा सविस्तर

नाशिक - कोविड सेंटरमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह नवीन बिटको रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हेच आदेश महिनाभरापूर्वी दिले असते, तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर

लवंग (सोलापूर) - माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य तज्ज्ञांची उपचारासाठी दमछाक होत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण दवाखान्यात दाखल होण्याचे वाढते प्रमाण पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्‍यातील दवाखाने आणि अकलूज व महाळुंग येथील कोव्हिड सेंटर अपुरे पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत सरासरी रोज 94 रुग्ण दाखल होऊन आजअखेर 1 हजार 418 कोरोना बाधित रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. वाचा सविस्तर

कोल्हापूर - कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा फायदाही समोर येत आहे. त्यामुळे लसीकरणासही मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र गंभीर, एकापेक्षा अधिक आजार, तसेच ॲलर्जीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्राशिवाय लस घेण्याचे धाडस करू नये, असा सल्ला वैद्यकीय यंत्रणेने दिला आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर ३० दिवसांत मोठी प्रतिकारशक्‍ती तयार होते. त्यातूनही कोरोना झाला तर मृत्यू वा रुग्ण गंभीर होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. वाचा सविस्तर

मुंबई - राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत राज्यात मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगवरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. आई कुठे काय करते, स्वाभिमान, सांग तू आहेस का आणि मुलगी झाली हो या मालिकांचं शूटिंग सिल्वासा इथं होणार आहे. वाचा सविस्तर