पुण्यात व्हेंटिलेटर बेडची कमतरता ते कोल्हापुरात बहिणींची कौमार्य चाचणी, वाचा ठळक बातम्या क्लिकवर

morming.jpg
morming.jpg

जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये 12 हजार 90 रुग्ण सापडले आहेत. एकीकडे पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना व्हेंटिलेटर बेडच शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे. तर कोल्हापुरात विवाहानंतर दोन बहिणींची कौमार्य चाचणी घेण्यात आली. त्यानंतर दोघींचा झालेला विवाह मोडून त्यांना माहेरी पाठविण्यात आले. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे हातपाय पसरले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक हवालदिल झाला आहे. एकीकडे प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवादेखील पसरत आहेत. याच अफवांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा एकदा जगभरात थैमान घालण्यास सुरवात केली आहे. असे असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूंसारखा आणखी एक धोकादायक विषाणू लवकरच जगाला त्रास देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर

श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शुक्रवारी सकाळी अवंतीपुरातील त्राल येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. या परिसरात अजूनही ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने पोलिस महासंचालकांच्या हवाल्याने दिले आहे. वाचा सविस्तर

पुणे - पुणे जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये 12 हजार 90 रुग्ण सापडले आहेत. त्यात पुणे शहरातील 7 हजार 10 रुग्ण आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 89 हजार 598 इतकी आहे. यातील 21 हजारांहून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 68 हजारांपेक्षा जास्त रुग्ण हे होम क्वारंटाइन आहेत. दरम्यान, एकीकडे पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना व्हेंटिलेटर बेडच शिल्लक नसल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर


कोल्हापूर - विवाहानंतर दोन बहिणींची कौमार्य चाचणी घेण्यात आली. त्यानंतर दोघींचा झालेला विवाह मोडून त्यांना माहेरी पाठविण्यात आले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी त्या दोन्ही बहिणींच्या पतींसह बेळगाव आणि कोल्हापुरातील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. हा प्रकार बेळगावात घडला. वाचा सविस्तर


मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला नियंत्रित करण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. मुंबईत रुग्ण संख्या वाढत असतानाच, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर्स, बेडस् बरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. रेमडेसिवीर कोरोनावर प्रभावी ठरणारे इंजेक्शन आहे. वाचा सविस्तर


नवी दिल्ली - सोशल मीडिया अॅप फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा डाउन झाले होते. युजर्सला या माध्यमातून मेसेज पाठवणं आणि रिसिव्ह करण्यामध्ये अडचणी येत होत्या. रिपोर्टनुसार, अशा प्रकारची समस्या जगभरातील अनेक देशांमधील युजर्सना आली. आता पुन्हा पुर्ववत अॅप्स सुरु झाली आहेत. वाचा सविस्तर


कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन सोमवार (१२) पर्यंत दुकाने बंद ठेवून त्यांच्या निर्णयाची वाट पाहू, असा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँण्ड ऍग्रीकल्चर संघटनेच्या व्हीसीमध्ये झाला. त्यामुळे सोमवार सकाळपर्यंत दुकाने बंदच राहणार आहेत. वाचा सविस्तर


नागपूर - मुंबई आणि पुण्यानंतर राज्यात सर्वात जास्त रूग्ण नागपुरात आढळत आहेत. त्यामुळे उपराजधानीसीठी मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लसींचा मुबलक साठा आवश्यक असताना केंद्र सरकारच्या भेदभावपूर्ण धोरणामुळे लसींचा साठा संपत आला आहे. मेडिकलमधील 'कोव्हॅक्सिन' लसींचे डोस संपले आहेत, तर कोविशिल्ड साठा केवळ शनिवारपर्यंतच पुरेल इतका आहे. वाचा सविस्तर


सोलापूर - कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्याच्या हेतूने शिवभोजन थाळी पार्सल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दहा रुपयांऐवजी पाच रूपयांत ही थाळी मिळणार असून त्यासाठी ओळखपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com