धनंजय मुंडेंना दिलासा ते शरद पवारांचं मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य; ठळक बातम्या एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील तिढा सुटताना दिसत नाही.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवारांनी जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरही भाष्य केलं. कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. कृषी कायद्यांवरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील तिढा सुटताना दिसत नाही.

मुंबईः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या पीडित महिलेनं तक्रार मागे घेतली आहे. सविस्तर वाचा

बेंगळुरु- कर्नाटकच्या शिवगोमा जिल्ह्यात गुरुवारी रात्री स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट झाला आहे. यात कमीतकमी 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.  सविस्तर वाचा

कोल्हापूर - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल यात कोणतीच शंका नाही, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा

मुंबई - आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणून नम्रता शिरोडकरचा उल्लेख करावा लागेल. ९० च्या दशकात या अभिनेत्रीनं आपल्या अभिनयानं सर्वांना जिंकून घेतलं होतं. नम्रताच्या जन्मदिनी तिच्या चित्रपट कारकीर्दिचा घेतलेला हा चित्रमय आढावा सविस्तर वाचा

पुणे : या नव्या वर्षात मेट्रोमधून दोन्ही शहरातील नागरिक प्रवास करू शकतील अशी अपेक्षा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी "सकाळ'च्या संपादकीय विभागाशी चर्चा करताना व्यक्त केली. सविस्तर वाचा

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेली आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत तेथील कोरोना प्रतिबंधक लसनिर्मितीचा प्रकल्प सुरक्षित आहे. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ज्यो बायडेन विराजमान झाले असून त्यांनी संपूर्ण प्रचारात अतिशय काळजीपूर्वक शब्दांचा वापर केला होता. बुधवारी (ता.२०) बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या भाषणाने अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाचे मन जिंकले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली - ‘कोरोनावरील भारतीय लस अत्यंत सुरक्षित व वैज्ञानिक कसोट्यांवर उतरली आहे. लसीकरणानंतर काही परिणाम जाणवणे हे सर्वसामान्य आहे. भारतीय लस कोरोना महामारीच्या शवपेटीवरील अखेरचा खिळा म्हणून सिद्ध होईल,’ असा विश्‍वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्यक्त केला. सविस्तर वाचा

उस्मानाबाद : भाई उद्धवराव पाटील यांनी संपूर्ण जीवनामध्ये याचा अंगीकार केला. युवकांनी राजकारणात काम करताना समाजाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. सविस्तर वाचा

पुणे- गुरुवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घेटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. या मोठ्या संकटानंतरही सीरमने आपलं काम अविरत सुरुच ठेवलं आहे.  सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning maharashtra india pune top 10 news sharad pawar dhananjay munde serum joe biden