esakal | धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत ते राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री? ठळक बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast Updates

भारत सरकारने भारतीय सेलिब्रिटींना पाश्चिमात्त्य सेलिब्रिटींविरोधात प्रतिक्रिया द्यायला सांगणं हे लाजिरवाणं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरुर यांनी दिली आहे.

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत ते राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री? ठळक बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारत सरकारने भारतीय सेलिब्रिटींना पाश्चिमात्त्य सेलिब्रिटींविरोधात प्रतिक्रिया द्यायला सांगणं हे लाजिरवाणं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते शशी थरुर यांनी दिली आहे. भारत सरकारच्या हट्टीपणामुळे आणि लोकशाहीविरोधी वर्तनाने तयार झालेल्या डागाळलेल्या भारताच्या जागतिक प्रतिमेला सुधारण्यासाठी एका क्रिकेटरच्या ट्विटचं उत्तर हा तोडगा असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. आपले ज्या महिलेशी संबंध आहेत असं मुंडेंनी मान्य केलं होतं त्यांनीच तक्रार केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी काँग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आला असल्याचे समजते.

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉपस्टार रिहाना आणि मिया खलिफा यांनी भारतात सुरु असणाऱ्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनावरील घेतलेल्या भुमिकेमुळे चर्चेत आल्या आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापले असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. वाचा सविस्तर 

नवी दिल्ली : गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा निर्धार ठाम राहिलेला आहे. वाचा सविस्तर 

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यास रिक्त होणारे पद शिवसेनेला सोपवण्याची तयारी कॉंग्रेसने दाखवली आहे. वाचा सविस्तर 

जिंद (हरियाना) : ‘राजा घाबरतो तेव्हा तो किल्ल्याची दारे बंद करतो. दिल्लीमध्ये रस्त्यांवर खिळे ठोकले जात आहेत, असे खिळे तर आम्ही आमच्या शेतामध्ये देखील लावतो, वाचा सविस्तर

जगात चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणं हा आहे. वाचा सविस्तर

सोलापूर : कॉंग्रेसमधील गटातटाच्या राजकारणावरुन आणि शहरातील नागरिकांच्या नाराजीचा अचूक वेध घेत भाजपने 2017 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेला धक्‍का दिला. वाचा सविस्तर 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. आपले ज्या महिलेशी संबंध आहेत असं मुंडेंनी मान्य केलं होतं त्यांनीच तक्रार केली आहे. वाचा सविस्तर 

पुणे : एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर देशद्रोहाचे कलम लावून त्याला त्वरित अटक करावी. वाचा सविस्तर 

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काहीच केले नाही, असा अपप्रचार शिवसेनेसह विरोधकांकडून सुरु आहे. वाचा सविस्तर 

Edited By - Prashant Patil