आज दिवसभरात - भंडारा रुग्णालय आग ते इंडोनेशिया विमान दुर्घटना; देश-विदेशातील बातम्या एका क्लिकवर

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

1) BhandaraHospitalfire | मन सुन्न करणारी घटना; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणे, ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. वाचा सविस्तर

2) धक्कादायक! भारतात कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू 
कोव्हॅक्सिन लशीच्या वैद्यकीय चाचणीत सहभागी झालेल्या दीपक मारावी या स्वयंसेवकाला लस टोचल्याच्या दहा दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. वाचा सविस्तर

3) फ्रान्सची भारताला मोठी ऑफर ! राफेल, पँथर हेलिकॉप्टर्ससाठी लवकरच महत्त्वाचा निर्णय 
भारत आणि फ्रान्सने संरक्षण सहकार्याला आणखी वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी फ्रान्सने मेक इन इंडिया अंतर्गत राफेल लढाऊ विमाने आणि पँथर हेलिकॉप्टर्सचे उत्पादन भारतात करण्याची ऑफर दिली आहे. वाचा सविस्तर

4) रामदास आठवले, डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणार; अमेरिकेतल्या हिंसाचारामुळे पक्षाचं नुकसान झाल्याची तक्रार
अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये झालेली घटना निंदनीय आहे. हा फक्त रिपब्लिकन पक्षाचाच नव्हे तर अमेरिका आणि लोकशाहीचा अपमान आहे. वाचा सविस्तर

5) कोणत्याही अ‍ॅपचं ग्रुप चॅट आता Signal वर; WhatsApp ला 'सुरक्षित' टक्कर
व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या अ‍ॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत. वाचा सविस्तर

6) ' तु जशी आहेस, तशी मला पसंद आहे ' एजाजचं पवित्राला प्रपोझ 
भारतीय टेलिव्हिजनवर लोकप्रियताचा नवा विक्रम करणा-या बिग बॉस या मालिकेत दर आठवड्याला व्टिस्ट येत असतात. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर

7) भारतात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात; तारीखही निश्चित
गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून सगळ्यांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनावर आता लस तयार झाली असून, ती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कामही सुरू झाले आहे. वाचा सविस्तर

8) इंडोनेशियात 62 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचा संपर्क तुटला, काही क्षणात रडारवरुन गायब
 विमानात 12 कर्मचाऱ्यांसह 62 प्रवासी होते. या विमानाचा शोध सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत विमानाचे लोकेशन समजू शकलेले नाही. वाचा सविस्तर

9) Aus vs Ind 3rd Test Day 3 Live : अश्विननं घेतली वॉर्नरची फिरकी, टीम इंडियाला दुसरे यश
सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. भारतीय संघाने 2 बाद 96 धावांवर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.

10) IPL 2021 Auction :लिलावापूर्वीच CSK अर्धा डझनहून अधिक खेळाडूंना देणार नारळ
चेन्नई सुपर किंग्जकडे नवे खेळाडू घेण्यासाठी केवळ 0.15 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळेच टीम मॅनेजमेंटने काही खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.वाचा सविस्तर

11) ब्रेकफास्ट अपडेट्सः भंडारा आग दुर्घटना ते ट्रम्प यांचा टिवटिवाट बंद; सगळ्या घडामोडी एका क्लिकवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top news latest 10 world india maharashtra bhandara america donald trump Indonesia