शरीफ यांनी "मोदींप्रमाणे' पाक सैन्याचा अपमान केला: इम्रान खान

वृत्तसंस्था
सोमवार, 31 जुलै 2017

"भ्रष्टाचारामधून मिळविलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी शरीफ हे पाकिस्तानच्या हिताशी तडजोड करत देशाच्या शत्रुशीही हातमिळवणी करतील,' अशी कडवट टीका इम्रान यांनी केली आहे

नवी दिल्ली -

anama-papers-verdict-pakistan-sc-finds-nawaz-sharif-guilty-disqualifies-him-63021" target="_blank">पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ 
यांनी पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्याची टीका पाकमधील तेहरिक-इ-इन्साफ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे. किंबहुना, "भारताचे पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी केला असता; तसाच अपमान शरीफ यांनी पाक सैन्याचा केला असल्याची,' भावना इम्रान यांनी व्यक्त केली आहे.

"डॉन' या प्रसिद्ध पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्येगेल्या वर्षी (2016) प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर सैन्य कारवाई करत नसल्याने शरीफ सरकार सैन्यावर नाराज असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर इम्रान यांनी हे मत व्यक्त केले आहे. शरीफ यांची झालेली हकालपट्टी इम्रान यांच्यासाठी मोठे राजकीय यश मानले जात आहे.

"भ्रष्टाचारामधून मिळविलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी शरीफ हे पाकिस्तानच्या हिताशी तडजोड करत देशाच्या शत्रुशीही हातमिळवणी करतील,' अशी कडवट टीका इम्रान यांनी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर इम्रान यांनी पाकिस्तानमध्ये "थॅंक्‍सगिव्हिंग रॅली' काढली होती. शरीफ यांनी 2013 मधील निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत इम्रानसमर्थकांनी 2014 मध्ये संसद व इतर सरकारी इमारतींना घेराओ आंदोलन केले होते. तसेच 2016 मध्ये पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादला वेढा घालण्याचा प्रयत्नही इम्रान यांच्याकडून करण्यात आला. हा प्रयत्न तांत्रिकदृष्टया अयशस्वी झाला; तरी यामुळे न्यायालयास शरीफ यांच्याविरोधातील पनामा पेपर्स प्रकरण सुनावणीसाठी घ्यावे लागले होते. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Imran Khan criticizes Nawaz Sharif