ट्रम्प यांची लशीबाबत घोषणा ते चीनला प्रत्युत्तर; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या ७ बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 September 2020

देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज लोधी स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताने पैंगोग त्सो तलावाच्या दक्षिण भागात चीनला जशासतसे उत्तर दिलं आहे. विदेशात, ट्रम्प यांनी कोरोना लशीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांनी यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला असल्याचं म्हटलं आहे. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर आज लोधी स्मशानभूमित त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याआधी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी कोरोनाचे प्रोटोकॉल पाळण्यात आले. मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी प्रणवदा यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सविस्तर बातमी-

चीनने पैंगोगच्या उत्तर भागात जे केलं, तेच भारताने दक्षिणेत करत दिलं प्रत्युत्तर

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पैंगोग त्सो सरोवराच्या Pangong Lake News उत्तर किनाऱ्यावर चीनने जे केले होते, भारताने त्याच्या या डावपेचाला दक्षिण किनाऱ्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने असा दावा केला आहे की, भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे त्यांच्या प्रदेशाचा ताबा घेतला आहे आणि या प्रदेशातून भारतीय सैनिकांनी परत जावं, असं तो म्हणाला आहे. सविस्तर बातमी-

केंद्र सरकारचे फेसबुकला पत्र; PM मोदींबद्दल कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप

वॉल स्ट्रिट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर भारतात फेसबुकने भाजपसोबत युती केल्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजपच्या पोस्टकडे फेसबुक कानाडोळा करत असल्याचं म्हणत विरोधकांनी निशाणा साधला होता. याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही फेसबुकला पत्र लिहिलं होतं. आता केंद्र सरकारनेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहिलं आहे. सविस्तर बातमी-

सर्वोच्च न्यायालयाकडून टेलिकॉम कंपन्यांना दिलासा, थकीत देणी भागवण्यासाठी 10 वर्षांची मुदत 

थकीत समयोजित महसुली देणी (एजीआर) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा दिलाय. थकीत देणी चुकती करण्यासाठी व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल, टाटा टेलिसर्विसेससारख्या कंपन्यांना 10 वर्षांची मुदत दिली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत कंपन्यांना 10 टक्के रक्कम भरावी लागेल, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.  सविस्तर बातमी-

काय सांगता! कोणतेही औषध न घेता HIV रुग्ण झाला बरा

इतिहासात पहिल्यांदाच असं घडून आलं आहे की, कोणत्याही उपचाराशिवाय एचआयव्ही HIV आजार बरा झाला आहे. मानवी शरीरातील रोग प्रतिकारशक्तीने या विषाणूला पूर्णपणे नष्ट केले आहे. या आश्चर्यकारण घटनेने जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर हैराण झाले आहेत. एचआयव्हीवर कोणताही इलाज नाही,ज्याला हा आजार झाला, त्याला आयुष्यभर गोळ्या आणि इतर उपचार करावे लागतात. त्यामुळे HIV आपसूक बरा होणे मोठी घटना मानली जात आहे. सविस्तर बातमी-

'कुणीच कल्पना केली नव्हती अशी गोष्ट आम्ही केली', कोरोना लशीबद्दल ट्रम्प यांची मोठी घोषणा 

AstraZeneca ही कोरोना लस सध्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच ट्रायलची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याला मंजुरी मिळेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. व्हाइट हाउसमधून घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला या गोष्टीचा आनंद आहे की एस्ट्राजेनेका लस ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. लवकरच या लशीला मंजुरी मिळू शकते. सविस्तर बातमी-

"यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला"

इराणचे सर्वोच्च नेता अयातोल्ला अली खामेनी यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) टीकास्त्र सोडले आहे. युएईने इस्त्राईलसोबत शांतता करार करुन मुस्लीम जगताचा मोठा विश्वासघात केला असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी यासदंर्भात ट्विट केलं आहे. सविस्तर बातमी-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paranav mukharjee chin sc telecom facebook bjp donald trump israiel uae iran corona vaccine 1 September