हृदयविकार आहे? 'हे' फळ खा अन् निश्चिंत राहा!

वृत्तसंस्था
Saturday, 28 December 2019

गरोदरपणातही फायद्याचे सिताफळ

- थकवा करतो दूर

- हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी

नवी दिल्ली : सिताफळ आपण अनेकदा खाल्ले असेल. पण ते खाल्ल्याने त्याचा शरीरावर काय फायदा होतो याची माहिती आपल्याला कदाचित नसेलही. पण या सिताफळचे अनेक फायदे आहेत. सिताफळमध्ये आरोग्याला आवश्यक असे पोषकतत्व आहेत. यातील विशेष बाब म्हणजे गरोदरपणात ते खाल्ल्यास गर्भवतीसह तिच्या पोटात वाढत असणाऱ्या बाळालाही मोठा फायदा होतो.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गरोदरपणात सर्वाधिक प्रमाणात खाल्ले जाणारे फळ म्हणून सिताफळची एक विशेष ओळख आहे. तसेच अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी त्याचा उपयोग केला जात आहे. उच्च रक्तदाब (high blood pressure) आणि कमी रक्तदाब (low blood pressure), मधुमेह (diabetes), हृदयरोग (heart disease) यांसारख्या आजारांवर प्रतिकारशक्ती (immune system) मजबूत बनवते.

Image result for custard apple

सिताफळामुळे आरोग्यास मोठी शक्ती मिळू शकते. तसेच विटामिन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स जास्त असल्याने ऍलर्जी आणि कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येणार आहे. 

कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला काद्यांने केले मालामाल

सिताफळमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशिअम असते. तसेच विटामिन ए देखील असल्याने ते सर्व डोळ्यांसाठी अत्यंत आरोग्यदायी असते. इतकेच नाहीतर अपचन, गॅसेसची समस्या असल्यास त्यातून मुक्तीही मिळू शकते. सिताफळाला कसेही खाता येऊ शकते. 

गरोदरपणातही फायद्याचे सिताफळ

गरोदरपणात सिताफळाला रोजच्या आहारातील भाग बनवा. गरोदरपणात कमीत कमी 3 सिताफळ खावेत. असे केल्यास पोटात वाढणाऱ्या बाळाचा झपाट्याने विकास होऊ शकेल. त्यामुळे बाळाच्या मेंदू आणि प्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होऊ शकते. गरोदरपणात नियमित सेवनाने गर्भपाताचा धोकाही कमी असतो. तर नॉर्मल डिलिव्हरीदरम्यान वेदनाही कमी होऊ शकतात. 

Image result for pregnant

सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढती

थकवा करतो दूर

सिताफळ खाल्ल्याने फक्त थकवा, सुस्ती कमी होते असे नाहीतर शरीरात असलेली कमतरता आणि मांसपेशींमध्ये होणाऱ्या वेदनेपासूनही आराम मिळतो. 

Image result for Tired

हृदयविकार झटक्याचा धोका कमी

नियमित सिताफळ सेवनाने मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या प्रमाण अधिक असल्याने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. जर सिताफळाचे नियमित सेवन केल्यास मांसपेशी मजबूत होतात आणि वेदना असल्यास त्यापासून आराम मिळतो. व्हिटॅमिन बी 6 होमोसिस्टीन संग्रह थांबवतो त्यामुळे हृदय रोगापासून बचाव होऊ शकतो. 

Image result for heart disease

फळबागांच्या माध्यमातून  प्रगतिपथावर वडकी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: custard apple are Helpful for various Disease