Healthy Heart Habits: निरोगी हृदयासाठी नियमितपणे करा 'या' गोष्टी, हृदयाचे आजार राहतील दूर

How To Prevent Heart Diseases: निरोगी हृदयासाठी रोजच्या आयुष्यात छोटे पण महत्त्वाचे बदल करून संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि हृदयरोग दूर ठेवा.
Adapt Good Habits For Healthy Heart
Adapt Good Habits For Healthy Heartsakal
Updated on

थोडक्यात:

  1. हृदय शरीरातील सर्व भागांपर्यंत रक्त व ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते.

  2. दम लागणे, छातीत दडपण, अशक्तपणा ही हृदयाच्या आजारांची लक्षणे असू शकतात.

  3. अनियमित जीवनशैली, ताणतणाव व व्यसनांमुळे हृदय कमजोर होते, पण साध्या सवयींमुळे ते निरोगी राहू शकते.

Daily Lifestyle Changes That Keep Your Heart Healthy: आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. शरीराच्या सगळ्या भागात रक्तपुरवठा करण्यापासून ते ऑक्सिजन पुरवण्यापर्यंत हृदय सतत कार्यरत असते. त्यामुळे ते आयुष्यभर निरोगी ठेवणे गरजेचे आहे.

थोड्याशा पायऱ्या चढल्यावर धाप लागणे, छातीवर दाब आल्यासारखे वाटणे, किंवा दिवसभर अशक्त वाटणे ही लक्षणे हृदयाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा असू शकतात. याव्यतिरिक्त वारंवार चक्कर येणे, पाय आणि गुढघ्याला सूज येणे आणि कोणतेही काम न करता बसलेले असताना देखील हृदय वेगाने धडधडणे ही देखील काळजी करण्यासारखी लक्षणे आहेत.

याला कारणीभूत अनियमित आहार, बैठी जीवनशैली, अतिरिक्त ताणतणाव, मद्यपान, धूम्रपान आणि अपुरी झोप या गोष्टी आहेत. परंतु काळजी न करता काही सोप्या आणि नियमित सवयी तुमचं हृदय निरोगी ठेवू शकतात. त्या सवयी कोणत्या, ते पुढे जाणून घेऊया.

Adapt Good Habits For Healthy Heart
Monsoon Kids Health Tips: मुलांमध्ये पोटाच्या तक्रारी वाढण्याकडे करू नका दुर्लक्ष; हवेतील आर्द्रता आणि दूषित अन्न-पाण्यामुळे होतोय त्रास

नियमित व्यायाम

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची आहे. आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम गतीचे व्यायाम (Moderate-Intensity Exercises) किंवा ७५ मिनिटे जास्त गतीचे (Vigorous Activities) व्यायाम करणे हृदयाला मजबूत करते. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. वेगात चालणे (Brisk Walking), जॉगिंग, पोहणे, सायकलिंग यासारख्या शारीरिक हालचाली हृदयासाठी फायदेशीर ठरतात. अगदी रोज रात्री जेवणानंतर अर्धा तास चालण्याची सवय लावली, तरी तुमच्या हृदयाच्या आरोग्यात मोठा फरक पडू शकतो.

संतुलित आहार

हृदयाच्या आणि एकंदरीत संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी व्यायामासोबतच संतुलित आहार घेणे महत्त्वाचे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवसाचा आहार जास्तीतजास्त संतुलित कसा ठेवता येईल यावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, डाळी, आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा. मात्र सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्सफॅट्स, साखर आणि मीठ यांचे कमी प्रमाणात सेवन करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत होते.

उत्तम झोप

सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात वेळेचे योग्य नियोजन करणे आणि त्याचसोबत आपल्या आरोग्याची काळजी घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे आरोग्यसाठी अतिशय गरजेची असलेली झोप घेणे देखील अवघड झाले आहे. पुरेशी झोप घेणे हृदयाच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे. यामुळे रक्तदाब सुरळीत होतो, जळजळ कमी होते आणि ताणावरही नियंत्रण मिळवता येते. अपुरी झोप हृदयाच्या आरोग्याचा, उच्च रक्तदाबाचा आणि स्ट्रोकचा धोका वाढवते.

Adapt Good Habits For Healthy Heart
AI For Heart Disease Detection: हृदयरोग निदानासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत; अवघ्या दोन मिनिटांत मिळणार अचूक रिपोर्ट

ताणतणावाचे नियोजन

सतत ताण घेणे रक्तदाब वाढीसाठी कारणीभूत ठरते. ज्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. यासाठी ताण कमी करण्याच्या पद्धती वापरणे फायदेशीर ठरते. दररोज योगा, खोल श्वासोच्छ्वास, किंवा घराजवळील बागेत थोडावेळ चालणे प्रभावी ठरते. याव्यतिरिक्त सकाळी १० मिनिटे ध्यान करणे दिवसाची सुरुवातही चांगली करते तसेच संपूर्ण दिवस आनंदात व्यतीत करण्यास मदत होते.

धूम्रपान बंद करणे

हृदयासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी धूम्रपान अतिशय हानिकारक आहे. तसेच धूम्रपान करणे हृदयाच्या आजारांच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. अनेक वर्षांची ही सवय मोडणे कठीण काम आहे, परंतु हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी उचलेले हे सर्वात मोठे पाऊल ठरते. यासाठी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींची, कुटुंबाची आणि मुख्य म्हणजे तज्ज्ञ मंडळींची मदत घ्या. तसेच व्यसनमुक्ती मोहिमांचा भाग होऊन ही सवय मोडण्याचा पर्यंत करा.

Adapt Good Habits For Healthy Heart
Oragan Donation Saves Two Lives: महिलेच्या अवयवदानाने दोघांना नवजीवनाचा आनंद; चेंबूरमधील कुटुंबाचा पुढाकार

मद्यपानाला आळा घालणे

हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर मद्यपान मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि वजनही वाढण्याची शक्यता असते, जे हृदयरोगाच्या धोक्यात भर घालू शकते. त्यामुळे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. स्त्रियांसाठी दिवसाला एक पेय आणि पुरुषांसाठी जास्तीत जास्त दोन पेय हे आरोग्यासाठी सुरक्षित मानले जाते. योग्य मर्यादा पाळल्या तर तुम्ही तुमच्या हृदयाची चांगली काळजी घेऊ शकता.

FAQs

  1. हृदयाच्या समस्या ओळखण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात? (What are early signs of heart problems?)
    हृदयाच्या समस्यांचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे थोड्या हालचालींनंतर दम लागणे, छातीत जडपणा जाणवणे, सतत अशक्त वाटणे इत्यादी.

  2. हृदय निरोगी राहण्यासाठी किती व्यायाम आवश्यक आहे? (How much exercise is good for heart health?)
    आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम किंवा ७५ मिनिटे जोरदार व्यायाम करणे हृदयासाठी उपयुक्त आहे.

  3. ताणतणावामुळे हृदयविकार होऊ शकतो का? (Can stress lead to heart problems?)
    होय, सततचा ताण रक्तदाब वाढवतो आणि हृदयरोगाचा धोका वाढवतो.

  4. हृदयाच्या आरोग्यासाठी धूम्रपान बंद करणे का आवश्यक आहे? (Why is quitting smoking important for the heart?)
    धूम्रपान हृदयविकारांचे मुख्य कारण असून, त्याला पूर्णपणे दूर ठेवणे हे हृदय रक्षणासाठी आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com