esakal | गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
sakal

बोलून बातमी शोधा

Good-Evening

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!... सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी... अरुण जेटली अनंतात विलीन... जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!... सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी... अरुण जेटली अनंतात विलीन... जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!

श्रीनगरच्या सचिवालयावर असलेला जम्मू-काश्मीरचा झेंडा काढून टाकण्यात आला असून, त्याजागी तिरंगा फडकला आहे.

(सविस्तर बातमी)

- सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी; वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकाविणारी पहिली भारतीय खेळाडू

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली.

(सविस्तर बातमी)

- अरुण जेटली अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे आज (रविवारी) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

(सविस्तर बातमी)

- ...तर यापुढे फेटा बांधणार नाही : डॉ. अमोल कोल्हे

डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या जिल्ह्यात आहे. यात्रेतील अंबाजोगाई येथील सभा शनिवारी (ता. २४) झाली.

(सविस्तर बातमी)

- राहुल गांधी, तुम्हाला काश्मीरला जायचे असल्यास आम्हाला सांगा; नियोजन आम्ही करू

राहुल गांधी यांना फक्त सहलीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जायचे असल्यास त्याचे नियोजन आम्ही करू, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

(सविस्तर बातमी)

- औरंगाबाद : जायकवाडी धरणात 'हायअलर्ट' जारी (व्हिडिओ)

जायकवाडी धरणात आज (रविवार) अचानकपणे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने पोलिस अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

(सविस्तर बातमी)

- अंतराळात घडला पहिला गुन्हा; नासा करणार चौकशी

पृथ्वीच्या परिघाबाहेर अंतराळात पहिला गुन्हा घडल्याची घटना घडली असून, नासा या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

(सविस्तर बातमी)

- प्रणिति शिंदेंच्या एकाधिकारशाहीला कंटाळले नेते

लोकसभा निवडणुकीतील मोदी त्सुनामी आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला जनतेचा प्रतिसादाचा अंदाज घेऊन आगामी विधानसभेत काँग्रेसमधून आपण निवडून येऊ शकत नाही याची खात्री वाटू लागलेले सोलापुरातील काँग्रेसचे नेते पक्षांतर करणार आहेत.

(सविस्तर बातमी)

- शिल्पा शिंदेचे खुलं आव्हान; पाकिस्तानात करणार परफॉर्म!

अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदेने ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असल्याचे म्हटले आहे. ती पाकिस्तानात परफॉर्म करणार असून, कोण अडवतो बघूच, असे खुले आव्हान तिने दिले आहे.

(सविस्तर बातमी)

loading image
go to top