गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल... मुख्यमंत्र्यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी... भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर'... प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल... मुख्यमंत्र्यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी... भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर'... प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...  

- पाकचं शेपूट वाकडंच! कुलभूषण जाधव यांना मदत नाकारली

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालात जाधव यांच्याशी विनाअट राजनैतिक संपर्क भारताला तातडीने प्रस्थापित करून देण्यात यावा, असा स्पष्ट आदेश देण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने त्यास आता नकार दिला आहे.

(सविस्तर बातमी)

- जम्मू-काश्मीर आमचा अंतर्गत प्रश्न; भारताने पाकला सुनावले खडे बोल

पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडल्यानंतर भारताने राजनैतिक संबंध जपण्यासाठी या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, असे सांगितले आहे.

(सविस्तर बातमी)

- मुख्यमंत्र्यांनी केली पूरस्थितीची हवाई पाहणी

गेल्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि कोयना धरणासह जिल्ह्यातील इतर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कराड तालुक्यातील शहरासह कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. या पूरस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली.

(सविस्तर बातमी)

- सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी : शरद पवार

कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, रायगड, पालघर या जिल्ह्यातील लोकांची गंभीर स्थिती आहे. या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) सांगितले.

(सविस्तर बातमी)

- भारत बांधतोय जगातला सर्वांत मोठा 'न्युक्‍लिअर रिऍक्‍टर'

जगातला सर्वांत मोठा 'प्लाझ्मा' (पदार्थाची चौथी अवस्था) 'फ्युजन न्युक्‍लिअर रिऍक्‍टर' मधील महत्वाचा भाग एक भारतीय कंपनी बांधत आहे.

(सविस्तर बातमी)

- प्रवाशांनो! आणखी दोन दिवस मुंबई-पुणे रेल्वे प्रवास टाळाच कारण...

सततचा पाऊस आणि घाट भागात रेल्वे रुळ खराब झाल्याने डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी आणि सिंहगड एक्स्प्रेससह अनेक गाड्या येत्या रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

(सविस्तर बातमी)

- खुशखबर! आता मिळणार मोफत इंटरनेट

15 जीबी डाटाही मिळणार या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.

(सविस्तर बातमी)

- तीन वर्षांत माझ्यात झाला एवढा बदल; विराटने केला व्हिडिओ पोस्ट

भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अत्यंत जागरुक असतो. त्याच्यामुळे भारतीय संघातील इतर खेळाडूंनासुद्धा फिटनेसचे महत्त्व कळाले. विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.

(सविस्तर बातमी)

- नुसरत जहाँचे हनिमूनचे फोटो व्हायरल

नवविवाहीत आणि नवनिर्वाचित पश्चिम बंगालच्या खासदार नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्या त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.. हे फोटो इतर कुठलेही नसून त्यांच्या हनिमूनचे आहेत. त्यांनी हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 8th August