‘देव हरवला’ चा अवघा खेळ झक्कास रंगला..

संभाजी गंडमाळे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पंढरपूरचा विठ्ठल ‘कानडा’ आहे. हाडाची काडं करून राब राब राबणाऱ्या श्रमकऱ्यांचा तो देव. प्रत्येक वर्षी पंढरपूरची वारी कैक मैलांची पाय तुडवत लाखो भाविक जात असतात.

कोल्हापूर : गायन समाज देवल क्‍लबच्या यंगस्टर्सनी गुरुवारी स्पर्धेत राहूल बेलापूरकर लिखित ‘देव हरवला’ या नाटकाचा सफाईदार प्रयोग सादर केला. पंढरपूरचा विठ्‌ठल, पंढरपूरची वारी आणि एकूणच मायेचा बाजार नाटकातून मांडताना या टीमनं साऱ्यांनाच अंतर्मुख केले. दिग्दर्शक प्रमोद पुजारी आणि त्यांच्या टीमनं हा दिमाखदार प्रयोग सादर करताना ‘माणूस अनवाणी चालत होता तोवर ठिक होतं. त्याच्या पायात वहाणा आल्या आणि त्याची चालच बदलली...’ असा संदेश देऊन गेला.

पंढरपूरचा विठ्ठल ‘कानडा’ आहे. हाडाची काडं करून राब राब राबणाऱ्या श्रमकऱ्यांचा तो देव. प्रत्येक वर्षी पंढरपूरची वारी कैक मैलांची पाय तुडवत लाखो भाविक जात असतात. याच वारीत पंढरपूरच्या विठोबाच्या दारातच लेखक राहूलची चप्पल चोरीला जाते. मुळात चप्पल चोरीला देण्याची तक्रार कुणी पोलिसांत केली तर त्याला वेड्यातच काढले जाते. पण, राहूलने ही तक्रार पोलिसांत दिली आणि या एकूणच साऱ्या प्रक्रियेत त्याला नाटकाचा विषय मिळाला.

पंढरपूरचा विठ्ठल ‘कानडा’

हा विषय अधिक अंगांनी खुलवताना मग त्यांनं पंढरपूरची वारी आणि एकूणच वारकरी सांप्रदाय, पंढरपुरातील व्यावसायिकांचं अर्थकारण असा सारा अभ्यास केला आणि हे दोन अंकी नाटक आकाराला आलं. तशी ही मुळ एकांकिका. साहजिकच अनेक स्पर्धांत या एकांकिकेने बक्षिसांची लयलूट केलेली. 

वर्तमानावर भाष्य करणार नाटक

यंदाच्या स्पर्धेत देवल क्‍लबच्या टीमनं मात्र हेच दोन अंकी नाटक रंगमंचावर आणलं. वारीतील विविध घटना, त्यात अभंग, कीर्तनाचा गोडवा आणि वर्तमानावर भाष्य करत हे नाटक वेगानं पुढं सरकतं. ध्वनी-प्रकाशाचा सुरेख मेळ साधत हा सारा अवघा मग खेळ ‘एकचि’ झाला, अशी अनुभुती प्रेक्षकांना देतो.

सहकार्यांची  भूमिका महत्वाची

सतीश तांदळेचा ‘पंढरी’ असो किंवा एकूणच सर्व भूमिका भारीच. प्रमोद पुजारी यांनी दिग्दर्शक म्हणून घेतलेलं कष्ट असेल किंवा सर्वच तंत्रज्ञांनी दिलेली सुंदर साथ असेल, त्यामुळे हा साराच खेळ झक्कास रंगला.  

पात्र परिचय...

 सतीश तांदळे (पंढरी) , प्रेरणा मोहिते (सखू) , युवराज मोरे (इन्स्पेक्‍टर) , एन. डी. चौगुले (पवार) , संजय पटवर्धन (शिंदे), नवनीत पटवर्धन (मुलगा) , गोपी वर्णे (वाळिंबे) , रवी कदम (वासुदेव ) , श्रीशैल फारणे (राजा/वारकरी) , सचिन पाटील (साथीदार/वारकरी) , डॉली कुराडे (हारवाली) , तुषार वेसणेकर (स्टॅंन्डवाला) , संकल्प माळी (कार्यकर्ता/ वारकरी) , सागर कोळी (फोटोग्राफर/वारकरी) , मारुती माळी (टाळकरी) , अक्षय कदम (चहावाला/ वारकरी) , प्रतिक पाटील (पुरुष/वारकरी) , प्रतीक्षा लोंढे (स्त्री) , उमा नामजोशी (बाई ) , उत्कर्ष केसरकर (सीडीवाला/ टाळकरी) , सुशांत कांबळे (वारकरी ) , साहिल गावडे (ताकवाला/ वारकरी) , अर्जुन पिसाळ (भिकारी / कैदी).

निर्मिती प्रमुख : उमा नामजोशी आणि सुबोध गद्रे  

संगीत : सुशांत कांबळे 
गायक : प्रसाद विभूतेमृदंग वादक : विक्रम परित 

हार्मोनियम : सुशांत कांबळे 
नृत्यदिग्दर्शिका :डॉली कुराडे पार्श्वसंगीत : संकेत भंडारे
प्रकाश योजना : अंकुश कुलकर्णी
नेपथ्य : सचिन पाटील  रंगमंच सहायक : वैभवी पाटील विशेष सहकार्य : अनुपम दाभाडे, रोहित पोतनीस, निहाल रुकडीकर, सुदर्शन खोत, सुमीत सासने

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

‘अंदाधुंद’ च्या प्रयोगातुन सत्ता नाट्याचा थरार 

‘हत्ती इलो रे मधून वेध लोकशाहीतील झुंडशाहीचा...! 

हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिआ वूल्फ मधून सुंदर खेळाची अनुभूती 

नातीगोती मध्ये उलघडले मतीमंद अन् त्यांच्या पालकांचे भावविश्व 

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dev Haravala In Kolhapur State Drama Competition