‘भेंद्र्याचा वाघ’ धमाल विनोदी अनुभव..!

Kolhapur Drama Competition :
Kolhapur Drama Competition :

कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेत बुधवारी हृदयस्पर्श सोशल ॲण्ड कल्चरल फाउंडेशनच्या टीमने नीलेश बोरकर लिखित ‘भेंद्र्याचा वाघ’ या प्रयोगाच्या निमित्ताने एक धमाल विनोदी अनुभव दिला. अगदी खरोखरच हौशी म्हणाव्या अशा टीमला घेऊन दिग्दर्शक पद्माकर कापसे यांनी हा दिमाखदार प्रयोग सादर केला. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणे, हाच प्रामाणिक हेतू या प्रयोगामागे होता.

गावात ‘एक गाव-बारा भानगडी’

भेंद्रे या गावात हे नाटक घडते. हे एक आटपाटनगर आहे आणि त्याचा भौगोलिक पत्ता कुणी विचारणार नाही व कुणी सांगणारही नाही. विशिष्ट काळात हे नाटक घडते, असेही नाही. बदललेले जग आणि भौतिक सुविधांची या गावाला कसलीच माहिती नाही. मात्र, ‘एक गाव-बारा भानगडी’ असेच हे गाव.

चांगल्या प्रयोगाठी कलाकारांची धडपड

इथला प्रत्येक माणूस इरसाल. त्यांच्यात घडणाऱ्या घटना, घडामोडी आणि त्यातच जेव्हा गावात दरोडेखोर घुसतो, तेव्हा रंजक कथा पुढे सरकत जाते. हौशी कलाकारांनी वठवलेल्या आपापल्या चोख भूमिका आणि एकूणच तांत्रिक बाबींचा सुरेख मिलाफ साधत, हास्याचा खळखळाट निर्माण करीतच या नाटकाचा प्रयोग रंगला. प्रयोग चांगलाच झाला पाहिजे, यासाठी संस्थेच्या प्रत्येक सदस्याची सुरू असलेली धडपडही वाखाणण्याजोगीच होती.

पात्र परिचय...
सुधाकर ढोकळे (विठ्या) , प्रसन्न माणगावकर (नान्या) , राम कलगुटगी (गणप्या) , आशिष भागवत (खरट्या) , प्रदीप माने (मारत्या) , सौरभ पोवार (बारक्‍या) , तुषार कुडाळकर (सरदार) , राकेश इंगवले (चिंचुक्‍या) , प्रकाश कोळी (आप्पा) , राधिका शर्मा (सावित्री) , अमरजा पाटील (कमळाक्का) , माधुरी फाटक (जनी) , जुई सोनटक्के (बकुळा).

  निर्माती, वेशभूषा : पद्मिनी कापसे
  दिग्दर्शक, संगीत : पद्माकर कापसे
  प्रकाश योजना :सुधीर अलगौडर
  रंगभूषा : सुनीता वर्मा
  नेपथ्य : राजेंद्र मगदूम

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com