नांदेडः अर्धापूरमध्ये महिलेला स्वाईन फ्ल्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

दोन कुटुंबांतील पाच संशियत रुग्ण; आराेग्य विभागाचा दुजोरा

अर्धापूर (नांदेड): अर्धापूर शहरात डेंगीचा रुग्ण आढळल्याची घटना ताजी असतानाच मोठ्या शहरात आढळून येणाऱ्या स्वाईन फ्ल्युने आता ग्रामीण भागात पाय पसरले आसून आंबेगाव येथील एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. हा रुग्ण आढळून आल्याचा दुजोरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. याच कुटुंबातील दोन व त्यांचे सुगाव येथील तीन नातेवाईक असे पाच संशयित रुग्ण असून त्यांना ताप, सर्दी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आंबेगाव येथील दोन रुग्णांंच्या रक्ताचे नमुने नांदेडला पाठविण्यात आले आहेत. या महिलेस उपचारासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. माेठ्या शहरात असलेला मुलगा भेटण्यासाठी गावी आला हाेता. त्याच्याकडून या आजाराचा प्रसार झाला असावा, असा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

अर्धापूर शहरात काही दिवसांपूर्वी डेंगीचा रुग्ण आढळला होता. या घटनेनंतर वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होते. त्यानंतर तालुक्यातील आंबेगाव येथील एका महिलेस साईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले. येथील एका कुटुंबातील मुलगा कामाच्या निमित्ताने बाहेर आहे. तो गेल्या आठवड्यात आंबेगावला आला होता. त्याला सर्दी, ताप हाेता. तो काही दिवसाने बरा झाल्यानंतर पुन्हा परत गेला. दरम्यानच्या काळात त्या मुलाची आई शिर्डीला गेली हाेती. तेथून परतल्यानंतर सोमवारी (ता. १४) ताप, सर्दीचा त्रास झाला. उपचारासाठी नांदेडला दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. येथे तापासणी झाल्यावर साईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तर आंबेगावमधील या कुटुंबात अन्य दोघांना ताप, सर्दीचा त्रास सुरू आहे. या कुटंबाचे नातेवाईक सुगाव येथे राहतात. ते नातेवाइकांना भेटण्याठी आंबेगावला आले होते. यातील एका महिलेस व दोन मुलांनीही ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. या दोन्ही कुटुंबात पाच संशयित रुग्ण आहेत. आंबेगाव येथील दोन रुग्ण नांदेडला उपचारासाठी दाखल झाले आहेत.

याबाबत अर्धापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. के. एच. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की आंबेगाव येथील एका महिलेला साईन फ्ल्यू झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कुटंबातील सर्वांचे व परिसरातील कुटुंबाचे सर्वेक्षण केले असता दोन रुग्ण संशयित आढळून आले आहेत. तसेच या महिलेस भेटायला आलेल्या तिघांना ताप आला आहे. या दोन्ही कुटुंबात पाच संशयित रुग्ण आहेत. हा आजार रुग्णांच्या संपर्कात आल्यावर श्वासच्छोस्वाद्वारे पसरतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: nanded news women died in swine flu