कोल्हापूरः अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमणार असून, त्याबाबतचा कायदा येत्या तीन महिन्यात करणार असल्याची माहिती आज (गुरुवार) विधी व न्यायमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली.

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून शासन नियुक्त पुजारी नेमावे, यासाठी आंदोलन तीव्र झाले असून, त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. आंदोलन तीव्र झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन महिन्यात विधी व न्याय विभाग निर्णय देईल, अशी ग्वाही पुजारी हटाव संघर्ष समितीला दिली होती.

कोल्हापुरात जल्लोष
विधानसभेत घोषणा होताच अंबाबाई मंदिरात साखर वाटून जल्लोष साजरा केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: kolhapur news ambabai mandir government to appoint the priest