अकोल्याचा दर्शन आयपीएलमध्ये झळकणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

अकोला क्रिकेट क्लब व व्हिसीएचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे यची आयपीएल 2020 स्पर्धेकरिता सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तो किंग्स एलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे. 

अकोला : अकोला क्रिकेट क्लब व व्हिसीएचा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू दर्शन नळकांडे यची आयपीएल 2020 स्पर्धेकरिता सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. तो किंग्स एलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे. 

विशेष म्हणजे यावर्षी दर्शनने बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या टी- 20 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत भारतातून सर्वाधिक 16 बळी घेतले. यापूर्वी दर्शनने 14, 16, 19, 23 स्पर्धेत विदर्भ व मध्यविभाग संघाचे प्रतिनिधीत्व केले. तसेच 19 वर्षीय भारतीय संघआकडून इंग्लंड येथे कसोटी तर आशिया कपकरिता मलेशिया येथे भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर दोन वर्षांपासून रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. यावर्षी आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळण्याची संधी त्यला मिळणार आहे. दर्शनच्या निवडीबद्दल त्याचे एसीसीचे अध्यक्ष नानुभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खर्ती, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ॲड.मुन्ना खान, गोपालराव भिरड, शरद अग्रवाल यांनी माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, सुमेध डोंगरे, पवन हलवणे, अमीत माणिकराव, शारिक खान, देवकुमार मुधोळकर,किशोर धाबेकर यांच्यासह क्लबच्या खेळाडूंनी त्यचे अभिनंदन केले.  

महत्त्वाची बातमी - कोई भी मुजरीम मॉ की कोख से पैदा नही होता

लहानपणापासून क्रिकेटची आवड
वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवातकरून दर्शनने उत्कृष्ट खेळाचे जिद्दीने व चिकाटीने प्रदर्शन करून अकोला क्रिकेट क्लबसह जिल्ह्याचे नाव राष्‍ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकविले. तसेच गेल्या पाच ते सहा वर्षांत क्लबच्या खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव आंतरराष्‍ट्रीय स्तरावर नेले ही बाब उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. दर्शनची निवड अभिमानास्पद असल्याची माहिती अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola's darshan will be reflected in IPL